CBI raids 9 places related to p Chidambaram and Karti chidambaram  Saam Tv
देश विदेश

Raid : चिदंबरम पिता-पुत्राशी संबंधीत ९ ठिकाणी सीबीआयचे छापे; कार्ती यांचं खोचक ट्वीट

CBI Raids Congress's Karti Chidambaram In New 'Bribe-For-Visa' Case : एका प्रकल्पासाठी चिनी कामगारांना व्हिसा मिळवून देण्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली: केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने (CBI) देशाचे माजी अर्थमंत्रा तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या घरावर छापा टाकला आहे. सीबीआयने पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांच्या दिल्ली (Delhi) आणि चेन्नईमधील ७ ठिकाणांवर छापे (Raid) टाकत आहे. पी. चिदंबरम हे काँग्रेस (Congress) सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा आणि लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांच्याशी संबधितही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (CBI raids 9 places related to p Chidambaram and Karti chidambaram)

हे देखील पाहा -

सीबीआयने एकूण ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. तामिळनाडू आणि मुंबईत तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर पंजाब, कर्नाटक आणि ओडिशामध्ये एक-एक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एका प्रकल्पासाठी चिनी कामगारांना व्हिसा मिळवून देण्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

याबाबत कार्ती चिदंबरम यांनी ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "असे किती वेळा घडले ते मोजायला मी विसरलो असे. हा एक विक्रम असेल." असं ट्वीट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्ती चिदंबरम हे सध्या भारतात नाही, ते लंडनला गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण परदेशात पैसे पाठवण्याशी संबंधित आहे. २०१० ते २०१४ दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासानंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT