Caste Census in Bihar SAAM TV
देश विदेश

Caste Census in Bihar: बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेवर बंदी, नितीश-तेजस्वी सरकारला मोठा झटका

Bihar News : बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेवर बंदी, नितीश-तेजस्वी सरकारला मोठा झटका

Satish Kengar

Caste Census in Bihar: बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणनेवर बंदी घालण्यात आली आहे. पाटणा उच्च न्यायालयाने नितीश सरकारला मोठा दणका देत ही बंदी घातली आहे. जाती जनगणनेच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) गुरुवारी हा आदेश दिला आहे.

पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती मधुरेश प्रसाद यांच्या खंडपीठाने या प्रकरणावरील युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर गुरुवारी हा निकाल दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार असून तोपर्यंत जाती जनगणनेला स्थगित करण्यात आलं आहे.

यातच आतापर्यंत गोळा केलेला डेटा सुरक्षित ठेवला जाईल. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचा दुसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. मात्र आता तो थांबवण्यात आला आहे. (Latest News)

पाटणा उच्च न्यायालयाने आदेश देऊन जातनिहाय जनगणनेला स्थगिती दिली आहे. अॅडव्होकेट जनरल पीके शाही यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी अद्याप निकालाची संपूर्ण प्रत वाचलेली नाही. वाचल्यानंतरच यावर काही सांगता येईल. उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जावे की, नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

पाटणा उच्च न्यायालयात जातनिहाय जनगणनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या युक्तिवादादरम्यान नितीश सरकारने आपली बाजू मांडली. जनगणना करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे सरकारने म्हटले आहे. ही जनगणना नाही. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसह इतर लोकांची गणना करावी लागेल.

बिहार सरकारचे वकील म्हणाले की, जातीनिहाय गणनेत लोकांना 17 प्रश्न विचारले जात आहेत. यामुळे कोणाच्याही गोपनीयतेचा भंग होत नाही. केवळ काही लोकच याच्या विरोध करत आहेत. बाकी सर्वजण मोकळेपणाने आपल्या जातीबद्दल सांगत आहेत आणि प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

दरम्यान, नितीश सरकार गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना करण्याच्या बाजूने आहे. नितीश सरकारने १८ फेब्रुवारी २०१९ आणि पुन्हा २७ फेब्रुवारी २०२० रोजी बिहार विधानसभा आणि विधानपरिषदेत जनगणनेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र केंद्राने याला विरोध केला आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून जातनिहाय जनगणना होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. केंद्राने सांगितले की, ओबीसी जातींची मोजणी करणे हे मोठे आणि कठीण काम आहे.

बिहार सरकारने गेल्या वर्षी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे काम जानेवारी २०२३ पासून सुरू झाले. ते मे महिन्यापर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र आता न्यायालयाने 3 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?

Kitchen Hacks : मिरची कापताच हातांची होतेय आग? साबण नाही, तर 'या' सोप्या उपायाने मिनिटांत जळजळ होईल कमी

Maharashtra News Live Update: BMC ची वनक्षेत्र आणि संरक्षित झोपडपट्टी परिसरात टॉवर उभारण्यास परवानगी

Pune : "तुम्हाला घरपोच दारू मिळेल" होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा

SCROLL FOR NEXT