explosive car seized Rajasthan saam tv
देश विदेश

150 किलो स्फोटकं भरलेली कार राजस्थानमध्ये पकडली, नववर्षाच्या पूर्वसंध्येला काय प्लान होता? तपास सुरू

rajasthan police seize explosive laden car ahead of new year : राजस्थानमध्ये दीडशे किलो स्फोटकं भरलेली कार पकडली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी ही कारवाई केली.

Nandkumar Joshi

explosive car seized in Rajasthan : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर हायअलर्टवर असलेल्या पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान सतर्कता दाखवत स्फोटकांनी भरलेली कार पकडली. राजस्थानच्या टोंक येथे ही कार ताब्यात घेण्यात आली. कारमध्ये १५० किलो स्फोटकं होती. त्यात अमोनियम नायट्रेट होतं. कारमधून ते घेऊन जात होते. ही स्फोटकं वाहून नेण्यामागचा कट काय होता, ती स्फोटकं कुठे नेण्यात येत होती, यामागच्या कारणांचा तपास सुरू आहे.

टोकचे डीएसपी मृत्युंजय मिश्रा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, एक कार बूंदी येथून निघाली. टोंक येथे ती जात होती. याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. बरौनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून ही कार रोखण्यात आली. झडती घेतली असता, कारमध्ये स्फोटकाचा मोठा साठा आढळला.

कारमध्ये १५० किलो अमोनियम नायट्रेट होतं. युरियाच्या गोण्यांमध्ये ते दडवून ठेवलं होतं. त्याचबरोबर २०० डेंजर एक्स्प्लोझिव्ह कार्टेज आणि सेफ्टी फ्यूज वायरचे साधारण ११०० मीटर सहा बंडलही होते. पोलिसांनी कारमधून स्फोटकं घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.

भंवरलाल (वय ४८), दुलीलाल (वय ३३) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. हे दोघेही करवर बूंदीचे रहिवासी आहेत. कारमध्ये सापडलेली स्फोटकं आणि त्याचा वापर कुठे होणार होता, याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. ही स्फोटकं कुठून कुठे घेऊन जात होते आणि ते कुणाकडे दिले जाणार होते, याबाबतची चौकशीही सुरू आहे. ही स्फोटके आणण्याचा हेतू काय होता, याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar: अक्षय कुमारने विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट; १२ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे, पोलिसांना सापडले पुरावे; सिया-चेतन करायचे कोड वर्डने चॅटिंग

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT