Jamshedpur Car Accident News  Saam TV
देश विदेश

Accident News: नववर्षाच्या पहाटे भीषण अपघात, कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळली; ६ जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Jamshedpur Car Accident: भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात ६ तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Jamshedpur Car Accident News

संपूर्ण देशात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असताना, झारखंडमध्ये भल्यापहाटे एक भयानक घटना घडली. पिकनिकला निघालेल्या तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात ६ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृत तरुणांचे वय साधारण: २५ ते ३० दरम्यान असल्याचं कळतंय. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात (Accident) जमशेदपूर जिल्ह्यातील बिस्तुपूर परिसरात असलेल्या सर्किट हाऊस चौकाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

सर्व जखमींना जमशेदपूरच्या टाटा मुख्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. छोटू यादव, हेमंत कुमार, सूरज कुमार, मोनू महतो, शुभम कुमार अशी मृतांची नावे आहेत. अन्य एकाची ओळख पटवणे सुरू आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत तरुण आदित्यपूर येथील बाबाकुटी आश्रम परिसरातील रहिवासी होते. नववर्षानिमित्त ते इंडिगो कारमधून पिकनिकसाठी निघाले होते. दरम्यान, त्यांची कार बिस्तुपूर येथील सर्किट हाऊस चौकाजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

क्षणार्धात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्कारचूर झाला या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राण सोडले. अजूनही दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

SCROLL FOR NEXT