Cancer Saam Tv
देश विदेश

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Cancer Research: कॅन्सर रुग्णांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ५ दिवसांत कॅिन्सर गायब करणारा डोस आला असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या एका डोसने गाठी पूर्णपणे नष्ट होतात. या व्हायरल मेसेजमागचे सत्य काय आहे ते घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • 5 दिवसांत कॅन्सर बरा होण्याचा दावा अतिशयोक्तीपूर्ण

  • CAR-T थेरपी संशोधनात आशादायी परिणाम

  • मेंदूच्या ट्यूमरवर अजूनही चाचण्या सुरू

  • तज्ज्ञांनी दिली सावधगिरीची सूचना

संदीप चव्हाण, साम टीव्ही

आता 5 दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस आल्याचा दावा करण्यात आलाय. एका डोसमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो असा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात...

कॅन्सर आता एका डोसमध्ये बरा होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. एकाच डोसने अवघ्या पाच दिवसांत गाठी पूर्णपणे नष्ट होतात असा दावा केलाय. ग्लायोब्लास्टोमाच्या उपचारात, म्हणजेच मेंदूच्या घातक ट्यूमर नष्ट होऊ शकतो असा दावा केलाय.'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हा दावा केलाय. मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहुयात...

ग्लिओब्लास्टोमा म्हणजे मेंदूच्या घातक ट्यूमरचा एक प्रकार आहे.यावर उपचार करण्यासाठी CAR-T सेल थेरपीने गाठ पूर्णपणे नष्ट करता येते असा मेसेज व्हायरल होत आहे. चाचणीदरम्यान उपचार घेतलेल्या पहिल्या तीन रुग्णांपैकी प्रत्येकाच्या ट्यूमरच्या आकारात झपाट्याने घट झाली असाही दावा केलाय. CAR-T थेरपी म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे जाणून घेऊयात...

CAR-T थेरपी म्हणजे काय?

CAR-T थेरपी ही कॅन्सरच्या उपचारांसाठी महत्त्वाची

रुग्णाच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक पेशींचा वापर करतात

रक्ताच्या कॅन्सरवरील उपचारासाठी CAR-T सेल थेरपी क्रांतिकारक

उपचारपद्धत रोगप्रतिकारक पेशींना कॅन्सरशी लढण्यास सक्षम करते

CAR-T थेरपी कशी कार्य करते?

रुग्णाच्या रक्तातून टी-पेशी काढल्या जातात

या पेशी प्रयोगशाळेत पाठवल्या जातात

विशिष्ट रिसेप्टर समाविष्ट करण्यासाठी जनुकीय बदल करतात

सक्रिय CAR-T पेशी रुग्णाच्या शरीरात परत सोडतात

पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेतली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

CAR-T थेरपीची ट्रिटमेंट आणि रिझल्ट सकारात्मक

आतापर्यंतचे ट्रायल फार चांगले आहेत

3 फेजमध्ये CAR-T थेरपीची ट्रायल होणार

पहिले ट्रायल सकारात्मक झाल्याने आशादायी

सध्या या CAR-T सेल थेरपीची चाचणी सुरू आहे. मात्र, ही थेरपीच्या माध्यमातून कॅन्सरची गाठ नष्ट होऊ शकते अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय. अजून उपचार सुरू झालेले नाहीत. भविष्यात मेंदूत होणाऱ्या कॅन्सरच्या गाठीसाठी हा उपचार होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT