Sakshi Sunil Jadhav
बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरच्या समस्याही वाढत चालल्या आहेत. वयानुसार कॅन्सरचा धोका कसा वाढतो आणि कोणत्या वयोगटात जास्त धोका असतो, याबाबत तज्ज्ञांनी दिलेली पुढील मुद्द्यात माहिती दिली आहे.
कॅन्सरचे निदान होण्याचे सरासरी वय जवळपास 65 ते 66 वर्षे असते.
55 ते 64 या वयोगटात कॅन्सर होण्याचा धोका जास्त प्रमाणात वाढू शकतो. पण कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण 65 ते 74 वर्षे वयोगटात आढळतात.
वयोमानानुसार शरीरातील पेशींची दुरुस्ती क्षमता कमी होते, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
वय वाढल्यावर इम्युनिटी कमी झाल्यामुळे कर्करोग पेशींना वाढणं सोपं होतं.
आयुष्यभर तंबाखू, धूर आणि प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने त्याचे परिणाम म्हातारपणात दिसतात.
75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कॅन्सरची लागन खूप सामान्य मानली जाते. 20 ते 30 वयोगटात कॅन्सरचं प्रमाण कमी असलं तरी तो होऊ शकतो.
अस्वस्थ आहार, व्यायामाचा अभाव, तणाव आणि वाईट सवयी कॅन्सरचा धोका वाढवतात. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत.