Lawrence Bishnoi Gang :  Saam tv
देश विदेश

Lawrence Bishnoi Gang : कुख्यात लॉरेन्सचा खेळ खल्लास? बिष्णोई गँग दहशतवादी म्हणून घोषित; कुणी केला घोषणा?

Lawrence Bishnoi Gang news : कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा कॅनडामध्ये खेळ खल्लास झालाय. कारण त्याच्या गँगला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

कॅनडा सरकारने बिष्णोई गँगला दहशतवादी संघटना घोषित केलं.

भारतीय वंशाच्या नागरिकांच्या व्यवसायांवर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई

गँगला आर्थिक मदत करणं आता कॅनडामध्ये गुन्हा मानला जाणार

कॅनडा सरकारने सोमवारी लाँरेन्स बिष्णोई याच्या नेतृत्वातील बिष्णोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं आहे. कंजरवेटिव आणि एनडीपी नेत्यांच्या मागणीनंतर कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कॅनडामधील नागरिकांना या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणे गुन्हा मानला जाईल.

बिष्णोई गँगचं भारतात मोठं जाळं आहे. लॉरेन्स बिष्णोईवर आरोप आहे की, जेलमध्ये लपून छपून मोबाईलचा वापर करून गँगवर नियंत्रण मिळवतो. कॅनडा सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटलं की, ही गँग हत्या, गोळीबार इत्यादी गुन्ह्यात सामील आहे. ही गँग विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या नागरिकांच्या व्यवसायावर थेट हल्ले करते.

कॅनडातील या निर्णयानुसार, देशातील कोणत्याही नागरिकाने या गँगला आर्थिक मदत दिल्यास ता गुन्हा मानला जाईल. मागील वर्षी आरसीएमपीने दावा केला की, 'भारतातील बिष्णोई गँगमधील गुंडांनी कॅनडामध्ये अनेकांच्या हत्या केल्या आहेत. तसेच ही गँग खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करते'.

कॅनडा सरकारने म्हटलं की, 'नव्या निर्णयामुळे गुन्हे रोखले जाईल. भारतीय वंशाच्या लोकांच्या सुरक्षेसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी अनंदसंगरी यांनी सांगितलं की, हिंसा आणि दहशतवादाला कॅनडामध्ये कोणतंही स्थान नाही. विशेष म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट समुदायाला भीती आणि धमक्यांच्या वातावरणात जगायला भाग पाडलं जातं'.

नव्या निर्णयामुळे कॅनडामधील सुरक्षाव्यवस्था आणखी बळकट होण्याची शक्यता आह. यामुळे दोन्ही देशाच्या सहकार्यालाही चालना मिळणार आहे. तसेच यामुळे कॅनडामधील भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढण्याची शक्यता आहे. कॅनडा सरकारच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण, गुप्तचर यंत्रणामधील सहकार्य आणि दहशतवाद्याविरोधातील कारवाईला गती मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

दगडूशेठ गणपती मंदिरात महिला भाविकांना १० रुपयांची ओवाळणी भेट|VIDEO

Genelia Deshmukh Photos: जेनेलियाचं स्टनिंग फोटोशूट, मादक अदांनी चाहते झाले घायाळ

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, सह्याद्री पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT