
चीनमध्ये गुइझोउ प्रांतात जगातील सर्वात उंच पूल
हुआजियांग ग्रँड कॅन्यन पूल ६२५ मीटर उंचीवर
या पुलामुळे २ तासांचा प्रवास अवघ्या ५ मिनिटांत होणार
China Builds World Highest Bridge Cuts Travel to 5 Minutes : चीनमधील गुइझोउमधील सर्वात उंच हुआजियांग ग्रँड कॅन्यन पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या पुलामुळे दोन तासांच्या प्रवासाला अवघे पाच मिनिट लागणार आहेत. हा पूल जमिनीपासून ६२५ मीटर उंचीवर आहे. हा जगातील सर्वात उंच पूल ठरला आहे. या पुलाचं बांधकाम करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागला. जगातील सर्वात उंच पूल हा घाटात १,४२० मीटरपर्यंत पसरला आहे.
चीनचा हुआजियांग ग्रँड कॅन्यन घाटाचा प्रदेश पार करण्यासाठी दोन तास लागतात. मात्र, नव्याने बांधकाम केलेल्या पुलामुळे अवघ्या पाच मिनिटांत हा प्रवास होणार आहे. पूल हा जमिनीपासून ६२५ मीटर उंचीवर आहे. या पुलाला बांधायला ३ वर्ष लागले. या पुलाची लांबी १,४२० मीटर इतकी आहे.
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनमधील या सर्वात उंच पुलामुळे देशातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. वाहतूक विभागाचे प्रमुख झांग यिन यांनी सांगितलं की, 'हुआजियांग ग्रँड कॅन्यन पूल खुला झाल्याने दोन तासांच्या प्रवासाला पाच मिनिटे लागणार आहेत'.
'या पुलामुळे स्थानिक वाहतूक सेवेचा विस्तार होईल. तसेच आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल. हुआजियांग ग्रँड कॅन्यन पूल १९० किलोमीटर लांबीच्या शांतियन-पुक्सी एक्स्प्रेसचा एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले.
चीनच्या दक्षिणेतील गुइझोऊ डोंगराळ भागात एक नदी आणि उंच दरी आहे. याच भागात हा ६२५ मीटर उंच पूल आहे. चीनमधील हा पूल जगातील सर्वात उंच ठरलाय. नव्या पुलामुळे बेइपानजियांग पूल दूसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.