C 295 Aircraft India Saam Tv
देश विदेश

C-295 Aircraft Specialty : कसं आहे टाटांच्या फॅक्टरीमध्ये तयार होणारं C-295 एअरक्राफ्ट; भारताने वाढवलं चीन-पाकिस्तानचं टेन्शन

C-295 Aircraft Explainer : टाटांच्या फॅक्टरीमध्ये C-295 एअरक्राफ्ट तयार होणारं आहे. यामुळे चीन-पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : भारतीय एअरक्राफ्ट उद्योगाने मोठं पाऊल टाकलं आहे. गुजरात स्थित टाटा अॅडवान्स सिस्टम लिमिटेड कंपनीत सी-२९५ एअरक्राफ्ट तयार करण्यात येणार आहे. भारतात तयार होणारा पहिला एअरक्राफ्ट असणार आहे. टाटा आणि फ्रान्सची एअरबस कंपनी मिळून हे एअरक्राफ्ट तयार करणार असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाने २०२१ साली एअरबस डिफेन्स आणि स्पेस एसए, स्पेनसोबत २१,९३५ कोटींचा करार केला होता. या करारांतर्गत भारताचे ५६ सी-२९५ टान्सपोर्ट एअरक्राफ्टचा भारताला पुरवठा होणार होता. तर एअरक्राफ्टच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाचे Avro-748 विमान बदलण्यात आलं होतं. या करारानुसार, १६ विमान स्पेनमधून पाठवण्यात येणार होते. सांगण्यात येत आहे की, २०२६ साली वडोदरा स्थित प्लांटमधून पहिला एअरक्राफ्ट तयार होणार आहे.

एअरक्राफ्टमध्ये एअर इंजिन सोडून सर्व पार्ट्स भारतीय बनावटीचे आहेत. एअरक्राफ्टमध्ये किमान १४ हजार पार्ट्स असून त्यातील १३ हजार पार्ट हे भारतीय बनावटीचे आहेत. एअरक्राफ्ट भारतीय बनावटीचे दिसत आहेत.

एअरबसने याआधी ३७ स्थानिक पुरवठादार शोधले आहेत. हे पुरवठादार एअरक्राफ्टचे कंपोनेंट बनवण्याचे काम करणार आहेत. एअरक्राफ्टच्या १४ हजार भागापैकी १३ हजार पार्ट्स आहेत. एअरक्राफ्टमध्ये आधी ४८ टक्के पार्ट हे भारतीय बनावटीचे होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन ७५ टक्के झाले. या माध्यमातून भारतीय कंपन्यांची जागतिक भागिदारी वाढणार आहे.

५ ते १० टन क्षमतेचा ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सैन्य दलाच्या तुकडी घेऊन जाण्याची क्षमता ठेवतो. या करारामुळे भारतात अनेक नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. एअरबस देखील उत्पादन भारतात स्थलांतर करत आहे. टाटा-एअरबसमधील करारामुळे प्रत्यक्षात ६०० नोकऱ्या निर्माण होणार आहेत. तर अप्रत्यक्षात ३००० नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT