Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

mahayuti News : महाराष्ट्राच्या राजकारणात कुछ तो बडा होने वाला है, अशी चर्चा रंगलीय... त्याचं नेमकं कारण काय आहे? मुंबई आणि दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला का सुरुय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
mahayuti News
mahayuti Saam tv
Published On

मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य, महायुतीतील अंतर्गत कुरघोडीच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.. शिंदेंनी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतलीय... तर इथे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यपालांची भेट घेतलीय.. त्यानंतर अजित पवारांनीही फडणवीसांसोबत चर्चा केलीय..अचानकपणे या भेटीगाठी वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कविर्तक सुरू झाले आहेत.

महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला

फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्याच्या विचारात

महायुतीतील वादामुळे शिंदे आणि अजित पवार अस्वस्थ

मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे शिंदेंची डोकेदुखी

धसांकडून मुंडेंवर आरोप केल्याने दादांनी भेट घेतल्याची चर्चा

पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठका

mahayuti News
Eknath Shinde : भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना चपराक; मालेगाव खटल्यावरून एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका,VIDEO

खरंतर नियोजित कार्यक्रम नसतानाही शिंदेंनी 2 दिवस दिल्लीत ठाण मांडलंय... यावेळी शिंदेंनी आधी भाजप नेते आणि त्यानंतर खासदारांसोबत बैठक घेतलीय... त्यामुळे खासदारांच्या बैठकीसोबतचं दिल्लीवारीचं खरं औचित्य नेमकं काय? असा सवाल विचारला जातोय..या प्रश्नाला शिंदेंनी मात्र बगल दिलीय.

mahayuti News
Eknath Shinde : भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना चपराक; मालेगाव खटल्यावरून एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका,VIDEO

या बैठकांचा सिलसिला महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्यासंदर्भात आहे का? हे दबाव तंत्र आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात होणाऱ्या सुनावणीनंतर विरोधात निर्णय आल्यास नेमकी काय रणनीती आखायची? यावर आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.

mahayuti News
Tribal Reservation : आदिवासी समाजासाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारचा गेमचेंजर निर्णय, ८ जिल्ह्यात सुधारित आरक्षण लागू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com