Gujarat 
देश विदेश

Election : ५ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

Assembly Bypolls 2025: गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील पाच विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर. निवडणूक आयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, मतदान १९ जून व मतमोजणी २३ जून रोजी होणार आहे. आचारसंहिता लागू.

Namdeo Kumbhar

ECI Announces Elections in Gujarat, Kerala, Punjab & Bengal : भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या आहेत.

गुजरात : (१) कडी (अनुसूचित जाती) : श्री. कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे (२) विसावदर: श्री. भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांच्या राजीनाम्यामुळे

केरळ : (३) निलांबूर: श्री. पी. व्ही. अनवर यांच्या राजीनाम्यामुळे

पंजाब: (४) लुधियाना वेस्ट: श्री. गुरप्रीत बसी गोगी यांच्या निधनामुळे

पश्चिम बंगाल: (५) कालिगंज : श्री. नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

अधिसूचना जारी होण्याची तारीख २६ मे २०२५; नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख २ जून २०२५; नामनिर्देशन छाननी ३ जून २०२५; उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून २०२५; मतदान १९ जून २०२५ आणि मतमोजणी २३ जून २०२५ रोजी होऊन निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ अशी आहे.

सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी १२ पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील. आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idol Dahi Handi 2025 : महिला, अंध व दिव्यांग गोविंदांसाठी दादरमध्ये अनोखी दहीहंडी|VIDEO

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

रात्री आक्रित घडलं; संततधारेमुळे भिंत खचली, गाढ झोपेत वृद्ध दाम्पत्यांच्या अंगावर पडली; जागीच मृत्यू

Maharashtra Politics : "ठाकरे बंधू एकत्र यावेत ही लोकांची इच्छा" माजी आमदार वैभव नाईकांनी दिले ठाकरे बंधूंच्या एकीचे संकेत

Mumbai Dahi Handi History: मुंबईत कधीपासून सुरू झाला दहीहंडी उत्सव, 100 वर्षाचा जुना इतिहास

SCROLL FOR NEXT