satish agnihotri  saam tv
देश विदेश

Bullet Train : रेल्वेची मोठी कारवाई; बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी सतीश अग्निहोत्रींची हकालपट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी महत्वकांक्षी मानल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांची हकालपट्टी करण्यात आली आहे

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी महत्वकांक्षी मानल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. रेल्वेच्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री (Satish Agnihotri) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ( satish agnihotri terminated )

अग्निहोत्री यांच्या कामाचा अतिरिक्त भार हा प्रकल्प संचालक राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सोपावला आहे. पदाचा गैरवापर करत एका खासगी कंपनीकडे अनधिकृत मार्गाने निधी वळवल्याचा ठपका त्यांचावर होता. त्यानंतर सतिश अग्निहोत्री यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

लोकपालांनी 'सीबीआय'ला अग्निहोत्री यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अंतर्गत आरोप सिद्ध होतो का,याची चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यानंतर सहा महिने किंवा १२ डिसेंबर २०२२ पर्यंत लोकपाल कार्यालयात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतीश अग्निहोत्री यांना पदावरून बडतर्फ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर तत्काळ अग्निहोत्री यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आलं आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी अग्निहोत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अग्निहोत्री हे सेवानिवृत्त होण्याआधीच त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सरकारी नियमांचे उल्लंघन केलं. केंद्राच्या परवानगी विना खासगी कंपनीमध्ये नोकरी करणे प्रतिबंध आहे. त्यामुळे सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याने अग्निहोत्री यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अग्निहोत्रीच्या जवळच्या सूत्रांनी सांगण्यात येत आहे की, त्यांनी सर्व आरोपाचे खंडन केले आहे. त्यांनी खासगी कंपनीचे समर्थन केले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या मुलाने देखील कोणत्याही फर्ममध्ये काम केले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT