नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसची (Corona) प्रकरणे सातत्याने वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा 18 हजारांच्या वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 18,815 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. हे आकडे आदल्या दिवसाच्या तुलनेत थोडे कमी आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 15,899 रुग्ण बरे झाले आहेत.
त्याचबरोबर या काळात आणखी 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 24 तासांत आणखी 38 जणांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनामुळे मृतांची संख्या 5 लाख 25 हजार 343 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 335 वर पोहोचली आहे. तर दैनंदिन सकारात्मकता दर आता 4.32% टक्के इतका झाला आहे.
हे देखील पाहा -
भारतात कोरोनाचा नवा सबव्हेरियंट BA 2.75 आढळला
भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा नवा सबव्हेरियंट आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याची नोंद घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितलं आहे की, यासंदर्भात संशोधन सुरु आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रकरणे वाढली आहेत
देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2,678 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. याशिवाय 3,238 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.