Budget 2024 in Red Bag Saam Digital
देश विदेश

Budget 2024 Intresting Fact: अर्थसंकल्प लाल रंगाच्या बॅगमधूनच का सादर केला जातो? काय आहे या मागचा रंजक इतिहास? जाणून घ्या

Budget Session 2024 Things To Know: ससंदेचं अर्थकंपल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र अर्थसंकल्पाची सर्व महत्त्वाची कागजपत्र एका लाल रंगाच्या ब्रीफकेस मधूनच सादर केली जातात, त्यामागे ब्रिटीशकाळापासूनचा रंजक इतिहास आहे.

Sandeep Gawade

ससंदेचं अर्थकंपल्पीय अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत आपला सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाच्या दिवशी प्रत्येक अर्थमंत्री हातात लाल रंगाची ब्रीफकेस किंवा बॅग घेऊन येतो. 2019 मध्ये सीतारामन यांनी ब्रीफकेस परंपरा मोडली आणि लाल रंगाच्या लेजरची निवड केली. 2021 मध्ये त्यांनी टॅब्लेट वापरला होता, परंतु तो देखील लाल कापडाने झाकलेला होता. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की ब्रीफकेस लाल रंगाचीच का असते किंवा लाल कापडाने का झाकली जात असेल?

अर्थसंकल्पाची ब्रीफकेस किंवा बॅगचा लाल रंग ब्रिटिशांशी संबंधित आहे. 1860 मध्ये ब्रिटीश चांसलर ग्लॅडस्टोन यांनी प्रथम राणीच्या मोनोग्रामसह लाल लेदर ब्रीफकेस सादर केली, ज्याला आज ग्लॅडस्टोन बॉक्स म्हणून ओळखलं जातं. लाल रंगाची निवड करण्यामागे दोन कारणं आहेत, पहिले म्हणजे सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या सैन्यात याला खूपच महत्त्व होतं.

त्यामुळे अर्थसंकल्प लाल रंगाच्या ब्रीफकेसमधून सादर करण्यात आला. दुसरे कारण म्हणजे 16 व्या शतकाच्या शेवटी, राणी एलिझाबेथच्या प्रतिनिधीने स्पेनचा राजदूत ब्लॅक पुडिंग काळ्या पुडिंगना मिठाईने भरलेली लाल रंगाची बॅग भेट दिली होती, त्यातून लाल रंगाची परंपरा सुरू झाली, अस तज्ज्ञांचं मत आहे.

अर्थसंकल्पाचा दिवस विशेष असतो आणि त्यावर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जातात, त्यामुळे त्यासंबंधीची कागदपत्रे असलेली बॅगही विशेष असते. त्यामुळे आकर्षक दिसणाऱ्या रंगाच्या ब्रीफकेस किंवा बॅगमध्ये ते सादर केले जाते. लाल रंग लक्ष वेधून घेत असल्याने, महत्त्वाच्या घोषणांसाठी हा रंग उत्तम पर्याय मानला जातो. याशिवाय लाल रंग हा भारतीय परंपरेचे प्रतिक मानला जातो. साधारणपणे धार्मिक ग्रंथ झाकण्यासाठी लाल कापडाचा वापर केला जातो, त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणेमध्ये या रंगाला विशेष महत्त्व असतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवसेना उमेदवार विजय शिवातारेंकडून आचारसंहितेचा भंग

Shadashtak Yog: सूर्य-गुरुची अशुभ दृष्टीमुळे ओढावणार 'या' राशींवर संकट; नात्यात टोकाचे वाद होण्याची शक्यता

Bank Job: १५०० रिक्त जागा अन् ८५००० रुपये पगार; यूनियन बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Maharashtra Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार, ९१ पदाधिकाऱ्यांनी सोडली साध, भाजपचा प्रचार करणार!

Winter Breakfast Ideas : हिवाळ्यात तुमची सकाळ होईल गोड; १० मिनिटात बनवा टेस्टी अन् हेल्दी ब्रेकफास्ट

SCROLL FOR NEXT