Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, सध्या प्रकृती कशी?

Joe Biden Corona Positive: जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, सध्या प्रकृती कशी?
Joe Biden Corona PositiveSaam Tv
Published On

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. लास वेगासमधील कार्यक्रमानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कोविड-19 ची टेस्ट (Covid- 19) करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी ही माहिती दिली. जो बायडेन यांचे लसीकरण करण्यात आले असून त्यांना बूस्टर डोसही देण्यात आला आहे.

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, जो बायडेन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे आता ते निवडणूक प्रचारापासून दूर राहणार आहेत. बायडेन यांनी डेलावेर शहरात स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी जनतेला धीर दिला की, अध्यक्षांना सौम्य लक्षणे असूनही त्यांचा मूड चांगला आहे.

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, सध्या प्रकृती कशी?
Jammu Kashmir News: जम्मू- काश्मिरमध्ये पुन्हा चकमक, डोडामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती; सर्च ऑपरेशन सुरू

बायडेन यांचे फिजिशियन डॉ. केविन ओ'कॉनर यांनी सांगितले की, बायडेन यांना सर्दी आणि खोकला यासारखी सौम्य लक्षणे आहेत. त्यांना थकवा देखील जाणवत आहे. त्यांना श्वासोच्छवासला देखील त्रास होत आहे. कार्यक्रमात गेले असता बायडेन यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांनी कोविड टेस्क केली. ती पॉझिटिव्ह आली. बायडेन यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर त्यांना अँटी व्हायरल औषधं देण्यात आली आहेत.

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, सध्या प्रकृती कशी?
Indian Crows : भारतीय कावळ्यांचा केनियाला त्रास? सरकारने 10 लाख कावळ्यांना मारण्याचा दिला आदेश, काय आहे कारण?

गेल्या महिन्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात झालेल्या चर्चेत त्यांच्या खराब कामगिरीनंतर प्रचारातून माघार घेण्यासाठी वॉशिंग्टनमधील देणगीदार आणि निवडून आलेल्या डेमोक्रॅट्सच्या वाढत्या दबावामुळे लास वेगासमधील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका डिबेट शोमध्ये बायडेन आणि ट्रम्प यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. ज्यामध्ये ट्रम्प हे बायडेन यांच्यावर वर्चस्व गाजवत होते. यावेळी बायडेन अनेक बाबींवर मौन बाळगून होते. तेव्हापासून बायडेन यांच्यावर राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे.

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, सध्या प्रकृती कशी?
Karnataka State Employment Bill : स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये मिळणार १०० टक्के आरक्षण; या राज्याने आणलं विधेयक, महाराष्ट्रात कधी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com