PM Modi US Tour Day 2: PM मोदी अमेरिकेत साजरा करणार योग दिन, जो बायडेन यांच्या पत्नी कार्यक्रमात होणार सहभागी

Modi Visit To USA 2023: अमेरिका दौऱ्याचा पहिला दिवस संपण्यापूर्वी त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि न्यूयॉर्कमध्ये अनेक विचारवंत नेत्यांशी चर्चा केली.
PM Narendra Modi  And Jill Biden
PM Narendra Modi And Jill BidenSaam tv
Published On

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत. या योग कार्यक्रमात फर्स्ट लेडी जिल बायडेन (Jill Biden) या देखील सहभागी होणार आहेत. पीएम मोदींचा 9 वर्षांतील हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. त्यांचा हा अमेरिका दौरा (PM Modi US Tour) अनेक बाबतीमध्ये विशेष ठरणार आहे.

PM Narendra Modi  And Jill Biden
Political News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; विरोधकांना शह देण्यासाठी आखला मास्टर प्लान

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ते न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. अमेरिकेच्या प्रोटोकॉलनुसार तेथील अधिकाऱ्यांनी मोदींचे स्वागत केले. अमेरिका दौऱ्याचा पहिला दिवस संपण्यापूर्वी त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि न्यूयॉर्कमध्ये अनेक विचारवंत नेत्यांशी चर्चा केली.

त्यानंतर पीएम मोदी आज शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करणार आहेत. योग दिनाचा कार्यक्रम यूएन मुख्यालयाच्या नॉर्थ लॉनमध्ये होणार आहे. एकता आणि शांतीचा संदेश पुढे नेण्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम' ही यावर्षीची थीम आहे.

यूएन जनरल असेंब्लीचे अध्यक्ष साबा कोरोसी, डेप्युटी सेक्रेटरी-जनरल अमिना मोहम्मद आणि इतर अनेक मुत्सद्दी आणि यूएन अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. न्यूयॉर्कमधील योग दिन कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे मध्य प्रदेशातील जबलपूर येथे उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय उत्सवाला संबोधित केले. त्यांनी सांगितले की, 'भारताच्या आवाहनावर 180 हून अधिक देशांचे एकत्र येणे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे.'

2014 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेत मांडण्यात आला तेव्हा विक्रमी संख्येने देशांनी दिलेल्या पाठिंब्याची आठवणही पंतप्रधानांनी यावेळी करुन दिली. योग दिनाच्या कार्यक्रमानंतर पीएम मोदी वॉशिंग्टन डीसीला रवाना होतील. जिथे ते दक्षिण आणि मध्य आशियाचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांच्या पार्श्वभूमी ब्रीफिंगला उपस्थित राहतील. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीच्या जॉइंट बेस अँड्र्यूज येथून व्हर्जिनियाला जाण्यापूर्वी ते फ्रीडम प्लाझा येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतील.

PM Narendra Modi  And Jill Biden
PM Modi Death Threat: PM मोदी, अमित शहांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांना २ फोन आले अन् सगळी यंत्रणा हादरली

न्यूयॉर्कच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी सीईओ, नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, अभ्यासक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना भेट घेणार आहेत. योग दिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसीला रवाना होतील. 22 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य रिसेप्शन होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन 22 जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन करतील.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभागृहालाही संबोधित करणार आहेत. 23 जून रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन संयुक्तपणे पीएम मोदींच्या स्वागतासाठी डिनरचे आयोजन केले आहे. याव्यतिरिक्त पीएम मोदी हे सीईओ आणि भारतीय डायस्पोरा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com