BSP Leader Armstrong India Today
देश विदेश

BSP Leader: बसपा नेते आर्मस्ट्राँग यांच्या हत्येतील आरोपीचा खात्मा; पोलीस चकमकीत ठार

Bharat Jadhav

बहुजन समाज पक्षाच्या तामिळनाडू युनिटचे प्रमुख के.आर्मस्ट्राँगच्या हत्येतील मुख्य आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. यानंतर त्याने कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झालाय. आर्मस्ट्राँगच्या हत्येतील आरोपी के. थिरुवेंगदम पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय. नेत्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्याराचा तपास करण्यासाठी आरोपीला शस्त्र लपवून ठेवलेल्या ठिकाणी नेण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनीवर हल्ला करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी के. थिरुवेंगदमला तपासासाठी उत्तर चेन्नईतील एका ठिकाणी नेण्यात आले तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळीबार केला. बसपा नेत्याच्या हत्येमध्ये वापरण्यात आल्यानंतर लपवून ठेवलेल्या शस्त्रांचा शोध घेण्यासाठी थिरुवेंगदमला तेथे नेण्यातं आलं होतं.

पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी गोळीबार जखमी झाला होता. त्यानंतर त्याला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी बसपा नेते आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींपैकी ३० वर्षीय थिरुवेंदम एक होता. तो कुख्यात गुन्हेगार होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी चेन्नई न्यायालयाने सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

आर्मस्ट्रांग यांची ५ जुलै रोजी एका टोळीने हत्या केली होती. त्यानंतर विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर सरकार आणि पोलिसांनी आपल्यावर होणाऱ्या आरोपांच्या बचावात उत्तर देताना आरोपींना शिक्षा होईल, असं आश्वसन सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी ११ जुलै रोजी पुदुकोट्टई जिल्ह्यात एका कुख्यात गुन्हेगारालाही ठार केले होतं.

थिरुवेंगदम ११ जुलैपासून चौकशीसाठी पोलीस कोठडीत होता. तसेच अन्य १० आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी ८ आरोपी व्ही. पोन्नई बालू, के मनिवन्नन, थिरुवेंगदम, डी रामू, जे संतोष, एस थिरुमलाई, जी अरुल, डी सेल्वराज यांनी हत्येनंतर लगेचच आत्मसमर्पण केले होतं. त्यानंतर पोलिसांनी गोकुळ, विजय आणि शिवशक्ती या तिघांना अटक केली होती. चौकशीदरम्यान थिरुवेंगदमने आर्मस्ट्राँगच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे पुरवल्याचे कबूल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT