''आज मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे'' Twitter/@ANI
देश विदेश

''आज मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे''

मला पक्षामध्ये बहुतेक पदे मिळाली जी कर्नाटकात कुणालाही मिळालेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''आज मी राजीनामा (Resign) देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू, असे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा (B S Yediyurppa) यांनी म्हटले आहे. कर्नाटकाकतील (Karnatak) बी.एस. येडियुरप्पा यांचे सरकार आज दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत आहे. मात्र दुसरीकडे येडीयुरप्पा यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत येडीयुरप्पा यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. ("I have decided to resign today," Yediyurappa said.)

- राजीनाम्याबाबत येडीयुरप्पा काय म्हणाले

मला पक्षामध्ये बहुतेक पदे मिळाली जी कर्नाटकात कुणालाही मिळालेली नाही. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो. मात्र, अंतिम निर्णय भाजपा हायकमांड घेईल. त्यांनी दिलेल्या सूचनांचे मी पालन करेन आणि पुढील मुख्यमंत्री दलित समाजातील असोत की इतर कोणत्याही समुदायातले असतील याची मला कोणतीही चिंता नाही. मी हा निर्णय मान्य करेन." माझे एकमेव ध्येय पुढील दोन वर्षांसाठी आहे. २०२३ मध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीसाठी परिश्रम करणे आणि कर्नाटकमध्ये भाजपाला पुन्हा सत्तेत आणणे, जेथे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

-राजीनाम्याचे कारण

येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वातील सरकारला दोन वर्षांचा काळ पुर्ण होत आहे. मात्र वाढते वय आणि आरोग्याच्या समस्यांमुळे येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावर राहणं शक्यता खुप कमी आहे. आरोग्याच्या कारणांमुळे शुक्रवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची देण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर आता येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, पक्षातील वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभुमीवर येडीयुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा विरोधी पक्षाच्या वर्तुळात सुरु होत्या.

- पक्षनेत्यांमध्ये मतभेद

गेल्या महिन्यात येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी भाजपच्या काही आमदारांनी केली होती. राज्याचे पर्यटनमंत्री सी.पी. योगेश्वरा यांनी मुख्यमंत्र्याऐवजी त्यांचा मुलगा कर्नाटकातील मंत्रालयांवर राज्य करत असल्याचा आरोप केला होता.

- येडीयुरप्पा यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण

येडीयुरप्पा यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे समोर येत आहे. पंचमसाली लिंगायत समाज कित्येक महिन्यांपासून मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे. बासनगौदा रामंगौडा पाटील यत्नाल, अरविंद बेलाड आणि मुरुगेश निरानी यांच्यासह भाजपाचे अनेक आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांचेही नाव घेतले जात आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा आणि भाजपा सरचिटणीस सीटी रवी हे गौडा समाजाला पक्ष उच्च कमांडने प्राधान्य दिल्यास पुढील मुख्यमंत्रीही होऊ शकतात. तसेच, अशोक आणि सी.एन. अश्वथनारायण यांच्या नावालाही पसंती असल्याचे समोर आले आहे.

- 2019च्या निवडणूकीत येडीयुरप्पा नंबर वन

2018मध्ये कर्नाटकात भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही बहुमत सिद्ध करु न शकल्याने भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. २०१९ मध्ये केंद्रात दुसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले. त्यानंतर कर्नाटकात भाजप अधिक सक्रीय झाला. २०१९ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे दिले. त्यानंतर कर्नाटकात 2019मध्ये येडियुरप्पा याचे सरकार आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येडियुरप्पा यांच्या कामाच्या तक्रारी हाय़कमांडला जात आहेत. येडीयुरप्पा यांनी आरोग्याच्या तक्रारीमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे, तर काही जणांनी येडीयुरप्पा यांच्या मुलाच्या हातात सत्ता असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT