King Charles Diagnosed with Cance Saam Tv
देश विदेश

King Charles: किंग चार्ल्स यांना कॅन्सरचं निदान, बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती

King Charles Diagnosed with Cance: किंग चार्ल्स यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. याबाबत बकिंगहॅम पॅलेसकडून माहिती देण्यात आली आहे.

Satish Kengar

King Charles Diagnosed with Cance:

ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. याबाबत बकिंगहॅम पॅलेसकडून माहिती देण्यात आली आहे.

बकिंघम पॅलेसने म्हटले आहे की, किंग चार्ल्स यांच्या वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींवर उपचार केते जात आहेत. उपचारादरम्यान त्यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. पॅलेसकडून कॅन्सरचा प्रकार उघड करण्यात आलेला नाही. मात्र त्यांच्यावर आता नियमित उपचार सुरू करण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बकिंगहॅम पॅलेसमधून मिळालेल्या माहितीनुसार, किंग चार्ल्स त्याच्या उपचाराबाबत पूर्णपणे सकारात्मक आहेत. चार्ल्स यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत. तसेच सध्या त्यांनी त्यांचे जाहीर कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.   (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, किंग चार्ल्स राज्याचे प्रमुख म्हणून आपली घटनात्मक भूमिका कायम ठेवणार आहेत. रविवारी सँडरिंगहॅममधील एका चर्चमध्ये ते दिसले, जिथे त्यांनी नागरिकांचं अभिवादन स्वीकारलं.

आठवडाभरापूर्वी लंडनमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर प्रोस्टेटची शस्त्रक्रिया झाली होती. बकिंघम पॅलेसने त्यावेळी सांगितले होते की, किंग चार्ल्स यांनी देशातील पुरुषांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या प्रोस्टेट शस्त्रक्रियेचे तपशील सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, चार्ल्स यांच्या प्रकृतीशी संबंधित अपडेट्स समोर आल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी किंग चार्ल्स यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

SCROLL FOR NEXT