Sharad Mohol Wife: शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पुणे पोलिसांकडून तपास सुरू

Sharad Mohol Case Latest Update: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमकी मिळाली असल्याची बातमी आहे.
Sharad Mohol Wife Death Threat
Sharad Mohol Wife Death ThreatSaam Tv
Published On

>> सचिन जाधव

Sharad Mohol Wife Death Threat

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची बातमी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाउंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याआधीही त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर स्वाती मोहोळ यांना मेसेज आणि आक्षेपार्ह पोस्ट करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. स्वाती मोहोळ यांना धमकी मिळाल्यानंतर पुणे पोलिसही सक्रिय झाले असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Sharad Mohol Wife Death Threat
Junnar Leopard Safari: आता जुन्नरमध्ये घेता येणार 'बिबट सफारी'चा आनंद, कधी आणि कसा? ते जाणून घ्या

दरम्यान, 31 जानेवारी रोजी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणेला पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर येथून त्याला पोलिसांनी अटक केली. शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर गणेश मारणे गेले अनेक दिवस फरार होता. पोलीसही त्याचा शोध घेत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याच दरम्यान त्याने अटकपुर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळला होता. मारणे याला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. यानंतर 31 जानेवारी रोजी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्यासह पोलिसांनी आणखी तीन लोकांना अटक केली होती.  (Latest Marathi News)

Sharad Mohol Wife Death Threat
Teachers Recruitment: शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली! राज्यात 20 हजारांहून अधिक जागांच्या निघणार जाहिराती; जाणून घ्या सविस्तर माहिती

मारणेला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी आधीच मोहोळ हत्या प्रकरणात १५ जणांना अटक केली होती. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com