Bride Wedding Dance Video Social media
देश विदेश

Bride Dance Viral Video : नव्या नवरीचा स्टेजवरच 'खत्रुड' डान्स; स्टेप्स बघून नवरदेवाला हसू आवरेना!

Bride Wedding Dance Video : रोमँटिक गाण्यावरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Saam TV News

Bride Dance Viral Video : लग्न म्हटलं की धम्माल...डान्स...मस्ती...आलीच नाही का? अलीकडच्या काळात नवरी आणि नवरदेव स्टेजवर रोमँटिक डान्स करून लग्नाचा दिवस कायम आठवणीत राहील कसा याचाच अधिक विचार करतात.

मित्रमंडळी, नातेवाईकांच्या समोरच हे कपल रोमँटिक गाण्यावर डान्स करतात. असाच एक रोमँटिक गाण्यावरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)

नव्या नवरीचा धम्माल डान्स (Dance Viral) आणि स्टेप्स बघून नवरामुलगा (Groom) खळखळून हसत असल्याचं व्हिडिओत बघायला मिळत आहे. नवरदेव आणि नवरीमुलगी दोघेही स्टेजवर उभे आहेत. काही लहान मुलंही स्टेजवर जातात. दुसरीकडे गाणं वाजत आहे. त्या गाण्यावर नवरीमुलगी बिनधास्त डान्स करताना या व्हिडिओत दिसते.

नवरीमुलगी बेभान होऊन डान्स करतेय आणि तिच्या स्टेप्स बघून बाजूलाच उभा असलेला नवरदेव खळखळून हसू लागला. व्हिडिओ बघणाऱ्यांना सुरुवातीला नवरदेव लाजत असल्याचं वाटतं. यावरच नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

हा व्हिडिओ एका यूजरच्या (@i_love_yau_1430) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आनंदाचे क्षण अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. शेकडो यूजर्सनं यावर हटके प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी नवरीच्या डान्सची खिल्ली उडवली आहे, तर काहींनी तोंडभरून कौतुक केलं आहे. नवरीनं असा काही डान्स केला की नवरदेव लाजून चूर झाला, अशाही प्रतिक्रिया या व्हिडिओवर देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT