Viral News : केस ओढले, लाथाबुक्क्यांनी हाणलं, भररस्त्यात मुलींमध्ये WWE चा थरार, पोरं फक्त बघतच राहिली!

शाळकरी मुली भर रस्त्यात एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे.
Girl Fight Viral Video
Girl Fight Viral Video Saam TV

Girl Fight Viral Video : रस्त्यावर होणारी भांडण तुम्ही अनेकदा पाहिली असतील. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अगदी शुल्लक कारणावरून सुरू असलेली भांडणं जीवघेणी सुद्धा ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  (Latest Marathi News)

Girl Fight Viral Video
Palghar Crime : चिमुकल्यांच्या डोळ्यांदेखत त्याने पत्नीला संपवलं; थरकाप उडवणारी घटना

यामध्ये शाळकरी मुली भर रस्त्यात एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे भांडण चालू असताना आजूबाजूला असलेली लोकं त्यांना थांबवण्याचे सोडून अजून त्यांचे प्रोत्साहन वाढवत आहेत. शाळकरी मुलींच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video)  होत आहे.

व्हिडीओत काय आहे?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या मुलींनी रस्त्यावरील फुटपाथलाच कुस्तीचं मैदान केलं आहे. त्या एकमेकींना तुंबळ मारहाण करताना दिसून येत आहे. या मारामारीत एक मुलगी त्या मुलीला मारता मारता तिच्या अंगावर खाली पडते. दुसरी मुलगीही त्या मुलीला मारायला जाते.

व्हिडीओ तुम्ही बारकारईने बघितला तर, भर रस्त्यात मुलींची भांडणं सुरू असताना, तिथे उपस्थित असलेली मुलं टाळ्या वाजवून या मुलींच्या भांडणाची मजा घेत आहेत. अखेर एक मुली हस्तक्षेप करते आणि हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते.

मुलींच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरच्या Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 44.7 K व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येतं आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com