Bride Viral Video Saam Tv
देश विदेश

एकीकडे लग्नाची गडबड अन् नवरीबाईला झोपचं आवरेना; विधी सुरू असतानाच... VIDEO तुफान VIRAL

Latest News: नवरीचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.

Priya More

Social Media: लग्न (Wedding) म्हटलं की प्रत्येक तरुण-तरुणींसाठी आनंदाचा क्षण असतो. लग्नातील मजा-मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. नवरा आणि नवरीचे अनेक मजेशीर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. असाच एक लग्नातील जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.

उत्तर भारतामध्ये अनेक लग्न ही रात्रभर सुरु असतात. या लग्नामध्ये अनेक विधी असतात त्यामुळे नवरा-नवरी हे बऱ्याचदा थकून जातात. या लग्नातील अनेक मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. असाच एका नवरीचा व्हिडिओ (Bride Viral Video) सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लग्नाचे विधी सुरु असताना नवरीला झोप आवरत नाही आणि ती डुलक्या मारत असल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद होतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

weddingworldpage या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्नमंडपात लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये नवरी दिसत आहे. तिने अतिशय सुंदर असा मेकअप केला आहे. लग्नाचे विधी सुरु आहे. नवरदेव पंडित सांगतात त्याप्रमाणे विधी करण्यात व्यग्र आहे तर दुसरीकडे नवरी या आनंदाच्या क्षणात बसल्या बसल्या झोपा काढताना दिसत आहे. तेवढ्यात तिला जाग येते आणि ती इकडे तिकडे पाहू लागते.

नवरीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने मजेशीर कमेंट केली आहे. त्याने असे लिहिले आहे की, 'झोपून जा दीदी, लग्नाचं काय ते दुसऱ्या दिवशीही होईल.'

दुसऱ्या नेटकऱ्याने असे लिहिले आहे की, ' नवरीला असे वाटते की अरे मी तर विसरुन गेली की आज माझं लग्न आहे. हे अजूनपर्यंत चालू आहे.' तर आणखी एका नेटकऱ्याने 'अरे मी कुठे आली.' अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यांच्या या मजेशीर कमेंट्स वाचून तुम्हाला सुद्धा हसू येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : डोकं शांत ठेवा! या 6 राशींना मिळणार मानसिक शांतता, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJP Protest: ज्ञानू मस्ट गो! दिपकेंचा इशारा; CJPचं मुंबईत जेल भरो आंदोलन

Tuesday Horoscope: नोकरीत नवीन जबाबदारी अन् आर्थिक लाभ; ‘या’ 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार फायदेशीर

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

SCROLL FOR NEXT