Viral Video: घरात लगीनघाई, वाजत गाजत वरात आली अन् नवरदेवासोबत घडलं भयंकर; ह्रदयद्रावक Video आला समोर

Viral Accident Video In Wedding: हौशी फोटोग्राफरच्या एका छोट्याशा चुकीने यामध्ये जीव गमवावा लागला आहे...
Viral Video
Viral VideoSaamtv
Published On

Viral Wedding Video: लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. दोन जिवांच्या नव्या आयुष्याची, नव्या प्रवासाची सुरूवात करुन देणारा हा शुभप्रसंग असतो. त्यामुळेच प्रत्येकजण आपल्या लग्नाची खास तयारी करत असतो. लग्नातील प्रत्येक गोष्ट हटके करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.

परंतु अशाच शुभप्रसंगी एखादी गोष्ट इतकी महागात पडू शकते ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. सध्या अशाच एका दुर्देवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.. (Latest Marathi News)

Viral Video
Akola Accident News: कारची दुचाकीला जबर धडक; भीषण अपघातात पती-पत्नी ठार

लग्न समारंभ म्हणलं की संपूर्ण घरात धामधूम आणि धावपळीचे वातावरण हे आलेच. अनेकदा धावपळीच्या या वातावरणात अशी एखादी मनसुन्न करणारी घटना घडते. ज्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral Video) व्हिडिओनुसार, नवरदेव वरात घेवून नवरीच्या दारातही आला. यावेळी नवरदेवाचे फोटो काढण्यासाठी, त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सर्वांचीच एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये कॅमेरामनसोबत हातात मोबाईल घेवून फोटो काढणारे तरुणही दिसत आहेत. अशाच एका तरुणाची एक चूक या अपघाताला कारणीभूत ठरली आहे.

Viral Video
Crime News In Parbhani : संतापजनक! नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; धक्कादायक घटनेचा Video

हा तरुण या लग्नाचा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करताना कठड्यावर चढतो. व्हिडीओ शूट करताना हा तरुण एका दगडावर मोबाईल ठेवतो. तोच दगड अचानक खाली कोसळतो आणि थेट नवरदेवावर पडतो. नवरदेवाच्या डोक्यावर थेट हा दगड पडताना दिसत आहे. ज्यामुळे नवरदेव तसाच जमिनीवर कोसळतो. या भयंकर घटनेने तिथं असलेले सर्व लोक घाबरतात. ज्यामुळे एकच खळबळ उडते. सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागतात.

हौशी फोटो ग्राफरच्या (Photographer) एका चुकीने हा भयंकर आणि भीषण अपघात घडला असून सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या व्हायरल व्हिडिओवर भावूक प्रतिक्रिया देताना अशा घटना टाळण्याचे आव्हान केले आहे. तसेच लग्नात हौशी मोबाईल फोटो ग्राफरला समजावले पाहिजे; अशा शब्दात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com