Veteran Samajwadi Party leader and former Uttar Pradesh Assembly Opposition Leader Ram Govind Chaudhary Dies Saam Tv
देश विदेश

Death News : ८ वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Samajwadi Party Leader Ram Govind Chaudhary Dies : सपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांचे लखनऊतील एसजीपीजीआय रुग्णालयात निधन झाले.

Alisha Khedekar

  • समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरींचे निधन

  • लखनऊ येथील एसजीपीजीआय रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास

  • चौधरी हे आठ वेळा आमदार राहिले असून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सांभाळले

उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोविंद चौधरी यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते दीर्घकाळापासून आजारी होते. लखनऊ येथील एसजीपीजीआय रुग्णालयात रात्री सुमारे १०.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे समाजवादी पक्षासह बलिया जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम गोविंद चौधरी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु होते. दरम्यान काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम गोविंद चौधरी यांचे नाव उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून ठळकपणे घेतले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून केली. मुरली मनोहर टाउन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते विद्यार्थी संघाच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात आंदोलनातील सक्रिय भूमिकेमुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत त्यांनी चिलकहर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर १९८०, १९८५, १९८९ आणि १९९१ मध्येही त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांनी बांसडीह विधानसभा मतदारसंघातून राजकीय वाटचाल सुरू ठेवली. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ते तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले. राम गोविंद चौधरी यांचा जन्म ७ सप्टेंबर १९५३ रोजी बलिया जिल्ह्यातील गोसाईपूर गावात झाला. त्यांचे वडील स्व. द्वारिका चौधरी होते. त्यांनी पदवी आणि एलएलबीचे शिक्षण घेतले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते वकील होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांना ते आपले राजकीय गुरु मानत होते.

मुलायम सिंह यादव यांच्या सरकारमध्ये २००३ ते २००७ या काळात त्यांनी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१२ मध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळाले. २०१७ मध्ये अखिलेश यादव यांनी त्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना केतकी सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही ते समाजवादी पक्षाच्या राजकारणात सक्रिय राहिले. राम गोविंद चौधरी यांच्या निधनावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक प्रदीर्घ अध्याय संपला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court Railway Ticket : ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना मिळणार नुकसानभरपाई, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, वीजेचा धक्का लागून ४ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Ginger Benefits: सलग ११ दिवस कच्चं आलं खा; वजन कमी होण्यासोबत शरीराला होतील 7 फायदे

Decoding Abhang: ‘मन माझे चपळ न राहे निश्चळ’… ओव्हरथिंकिंग का होतं? संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात मिळेल उत्तर

SCROLL FOR NEXT