Manish Sisodia granted interim bail for 3 days to attend nieces wedding sbk90 Saam Tv
देश विदेश

Manish Sisodia Bail: ब्रेकिंग! आप नेते मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, १८ महिन्यांनंतर होणार सुटका

Manish Sisodia Bail in Delhi excise policy case: आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ९ ऑगस्ट २०२४

आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली मद्यघोटाळा प्रकरणात सीबीआय आणि ईडीने केलेल्या कारवाईमध्ये मनिष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला असून तब्बल १८ महिन्यानंतर ते जेलमधून बाहेर येणार आहेत.

मनिष सिसोदिया यांना जामीन मंजूर

आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कथित मद्यघोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मनिष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल १८ महिन्यानंतर मनिष सिसोदिया हे अखेर जेलमधून बाहेर येणार आहेत.

मनिष सिसोदिया यांना गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. अखेर १८ महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांना १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ईडी आणि सीबीआय प्रकरणात सिसोदिया यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा बाँड भरावा लागणार असून ते आता तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

मनिष सिसोदिया यांना ट्रायल कोर्टात पाठवण्याची ईडीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे हे ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाने समजून घ्यायला हवे. खटला पूर्ण केल्याशिवाय कोणालाही तुरुंगात ठेवता येत नाही आणि शिक्षाही करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने त्यांना पासपोर्ट सरेंडर करण्याची आणि साक्षीदारांवर प्रभाव न टाकण्याची अट घातली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard : पुण्यानगर नगरमध्येही बिबट्याचा हल्ला, ४ वर्षाच्या चिमुकलीचा घेतला बळी

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

SCROLL FOR NEXT