Punjab Political News  AI image
देश विदेश

Breaking News : राजकारणात खळबळ! बड्या नेत्याने सोडली आम आदमी पक्षाची साथ

Punjab Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. चमकौर साहिबचे विद्यमान आमदार डॉ. चरणजीत सिंह यांनी AAP सोडून सुखबीर सिंह बादल यांच्या उपस्थितीत शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला.

Alisha Khedekar

पंजाबमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला असून चमकौर साहिब मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. चरणजीत सिंह यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला आहे. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून सदस्यत्व दिले.

सुखबीर सिंह बादल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत डॉ. चरणजीत सिंह हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असल्याचे म्हटले. तसेच त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात योग्य सन्मान आणि महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे आश्वासनही दिले. त्यांच्या प्रवेशामुळे चमकौर साहिब परिसरात अकाली दलाची ताकद वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आम आदमी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चमकौर साहिबमधून डॉ. चरणजीत सिंह यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्या जागी जसबीर सिंह गढी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अकाली दलात प्रवेश केल्याने पंजाबच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. चरणजीत सिंह यांनी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला होता. त्यांनी सुमारे आठ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. याआधी २०१७ मध्येही त्यांनी चन्नी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

अकाली दलात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले. पक्षाने चन्नी यांच्याशी संगनमत केल्याचा दावा करत, आपल्याला उमेदवारी नाकारण्यामागे हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघात ५६ कोटी रुपयांचा कालवा प्रकल्प आणि २५ कोटी रुपयांचा अन्य प्रकल्प मार्गी लागल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आतापर्यंत आठ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. पक्षाने ११७ पैकी ७१ उमेदवारांची घोषणा केली असून अजून ४६ जागांवरील उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे आगामी काळात पंजाबमधील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनच्या जेवणात चक्क लोखंडी बोल्ट! प्रवाशाच्या तक्रारीनंतर IRCTC ची मोठी कारवाई

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये कचरा किती वेळ ठेवला पाहिजे? तो कधी बाहेर टाकावा? वास्तुशास्त्रात सांगितलेत खास नियम

टॉयलेट स्वच्छ कसा करायचा?

Maharashtra News Live Update: महिला आरक्षणावर निलम गोऱ्हेंचा काँग्रेसवर निशाणा; ‘पक्षात ५० टक्के आरक्षण का दिलं नाही?’

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोग 2028 पर्यंत लांबल्यास काय होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT