ISRO SCIENTIST RESIGNATIONS: CENTRE TAKES CONTROL AS OVER 100 EXPERTS QUIT AMID GAGANYAAN CONCERNS Saam Tv
देश विदेश

ISRO News : इस्रोमधील १०० शास्त्रज्ञांचे तडकाफडकी राजीनामे, गगनयान मोहिमेबाबात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ISRO Update News : इस्रोमधील 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गगनयानसारख्या महत्त्वाच्या मोहिमांवर परिणाम होऊ नये म्हणून आता शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यांवरील अंतिम निर्णय थेट अंतराळ विभाग घेणार आहे.

Alisha Khedekar

  • इस्रोमधील १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्याची माहिती

  • राजीनामा देणाऱ्यांमध्ये गगनयान मोहिमेवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांचाही समावेश

  • केंद्र सरकारने शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यांवर थेट नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला

भारताला चंद्रापर्यंत नेणाऱ्या, सर्वात कठीण मंगळ मोहीम यशस्वी करणाऱ्या, नासासारख्या बलाढ्य संस्थेसमोर अगदी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या इस्रोबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इस्रोमधील तब्बल १०० शास्त्रज्ञांनी गेल्या महिनाभरात राजीनामे दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राजीनामे देणारे शास्त्रज्ञ हे भारताची सर्वात महत्त्वाकांक्षी गगनयान अंतराळ मोहिमेवर काम करत होते. दरम्यान सतत सुरु असलेल्या राजीनाम्यांच्या धडाक्यात केंद्र सरकारने कोणत्याही सेंटरच्या संचालकांना त्यांच्या पातळीवर राजीनामा मंजूर करता येणार नाही असा आदेश काढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,राजीनामा दिलेल्या शास्त्रज्ञांमध्ये बंगळुरू येथील यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरमधील सुमारे ८० कर्मचारी तर तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील किमान २० शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या राजीनाम्यांमुळे इस्रोच्या भविष्यातील मोहिमांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान आता राजीनाम्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाने (DOS) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, गगनयान तसेच इतर महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांशी संबंधित ‘ग्रुप ए’ शास्त्रज्ञांचे राजीनामे किंवा व्हीआरएस आता नियमित प्रशासकीय प्रक्रिया म्हणून हाताळली जाणार नाहीत. यापुढे इस्रोच्या कोणत्याही केंद्राच्या संचालकांना अशा राजीनाम्यांना मंजुरी देता येणार नाही.

संबंधित प्रत्येक अर्ज थेट अंतराळ विभागाकडे पाठवला जाईल आणि अंतिम निर्णय तिथेच घेतला जाईल. गगनयानसारख्या महत्त्वाच्या मोहिमांच्या पार्श्वभूमीवर अनुभवी शास्त्रज्ञांचे संस्थेतून बाहेर पडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात इस्रोतील मनुष्यबळ टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून मोठी पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा,उपोषण सोडण्याची विनंती

Air Conditioner Tips : AC चा अतिवापर ठरू शकतो धोकादायक! जाणून घ्या दुष्परिणाम

Devendra Fadanvis : ग्रामीण भागातही मिळणार अत्याधुनिक कॅन्सरचे उपचार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता

Naturally ripened bananas: केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची? जाणून घ्या ५ सोपे मार्ग

SCROLL FOR NEXT