Israel launches missile attack in response to Iran assault:
Israel launches missile attack in response to Iran assault: Saamtv
देश विदेश

Israel Attack On Iran: मोठी बातमी! इस्रायलचा इराणवर हल्ला; क्षेपणास्त्र डागल्याचा दावा, अनेक शहरं हादरली

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १९ एप्रिल २०२४

इराणने ड्रोण आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्राइलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज इस्राइलने इराणवर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. इस्राइलने इराणच्या अणुकेंद्रांना निशाणा बनवत क्षेपणास्त्रे डागली आहेत. तसेच इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचा दावा इराणमधील माध्यमांनी केला आहे.

इराणच्या दुतावासावर इस्राइलने केलेल्या एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याचे दिसत आहे. इराणने इस्राईलवर रविवारी हल्ले केले होते. इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी १४ एप्रिलला रविवारी मोठ्या प्रमाणावर हल्ले केले होते. त्यानंतर आता इस्रायलनेही इराणवर हल्ला केला असून सीरियातील वाणिज्य दूतावासावर केलेल्या हल्ल्याचं केल्याचे सांगण्यात येत आहे.

इराणच्या शहरात त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा काम करत असल्याचे काही व्हिडिओंमध्ये दिसत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, हा इस्रायलकडून पहिला हल्ला इस्फहानमध्ये झाला. त्याच शहरात इराणचा अणु प्रकल्प आहे. या हल्ल्यानंतर इराणने आपल्या हवाई हद्दीतील सर्व फ्लाइट्सवर बंदी घातली आहे. यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आतापर्यंत इराणच्या ९ ठिकाणांना लक्ष्य केल्याची बातमी आहे. इराणसोबतच इस्रायलने इराक आणि सीरियामध्येही इराण समर्थित लष्करी तळ बांधले आहेत. हल्ल्यानंतर इराणने आपल्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. इराणचे प्रॉक्सी सीरिया आणि इराकमध्ये आहेत आणि या प्रॉक्सींनी यापूर्वीच्या हल्ल्यातही इराणला मदत केली होती. आता इस्रायलने त्यांना लक्ष्य केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT