Pakistan Air Strikes
Pakistan Air StrikesSaam Tv

Pakistan Air Strikes On Iran: पाकिस्तानचा इराणवर हवाई हल्ला, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Pakistan Air Strikes: पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ला केलाय. यात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यात अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केलाय. इराण दहशतवाद्यांना आश्रय देतो, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.

Pakistan Attack On Iran

पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानने हवाई मार्गाने इराणमध्ये घुसून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुचिस्तान लिबरेशन फोर्स (बीएलएफ) च्या अनेक ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला (Pakistan Air Strikes) आहे. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याची माहिती पाकिस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. मात्र, हा हल्ला कुठे, किती आणि कोणाच्या निशाण्यावर करण्यात आला, हे पाकिस्तानकडून अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

पाकिस्तानातून इराणमध्ये हवाई हल्ला

यापूर्वी इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तान चिडला होता. पाकिस्तानातील राजकीय लोक आणि सर्वसामान्य जनता याविरोधात सोशल मीडियावर सातत्याने निषेध करत आहे. आता पाकिस्तानातून इराणमध्ये हवाई हल्ल्याची बातमी आली आहे.

या हल्ल्यात दहशतवाद्यांचं मोठं नुकसान

इराणमध्ये बीएलए दहशतवाद्यांच्या अनेक लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानी माध्यमांचा दावा आहे की, इराणमध्ये घुसल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फोर्स आणि इतर दहशतवादी संघटनांचे अनेक ठिकाणं उडवून दिले (Pakistan Attack On Iran) आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचे मोठं नुकसान झालंय.

पाकिस्तानने केले आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेलं नाही. हा हल्ला कुठे, कोणावर आणि केव्हा करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. इराण (Iran) दहशतवादी संघटनांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने (Pakistan) यापूर्वी केला होता. तर इराणनेही पाकिस्तानवर असेच आरोप केले होते. मात्र, दोन्ही देशांनी दहशतवाद्यांशी कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचा इन्कार केला आहे.

Pakistan Air Strikes
Iran-Pakistan War: इराणच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान चवताळला; थेट सिस्तानमध्ये घुसून AIR STRIKE

इराणचेही पाकिस्तानवर हल्ले

5 वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते होते. आता भारतानंतर इराणनेही पाकिस्तानातील कथित दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्ताननेही इराणमधील बलुच दहशतवादी गटांवर हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिल्याची माहिती (Pakistan Attack On Iran) मिळतेय.

Pakistan Air Strikes
Bees Attack On Women: मधमाशांच्या हल्ल्यात ६ महिला मजूर गंभीर जखमी; भंडारा जिल्ह्यात नागरिकांमध्ये घबराट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com