Iran-Pakistan War: इराणच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान चवताळला; थेट सिस्तानमध्ये घुसून AIR STRIKE

Pakistan Airstrike on Iran: खवळलेल्या पाकिस्तानने इराणमधील ७ ठिकाणांवर हवाई हल्ला केल्याचा दावा केलाय.
Pakistan Airstrike on Iran
Pakistan Airstrike on IranSaam TV
Published On

Iran-Pakistan War Latest News

बलुचिस्तान प्रांतात घुसून इराणने मंगळवारी एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे दोन अड्डे उध्वस्त केले. यामुळे पाकिस्तान चवताळून उठला असून इराणवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. खवळलेल्या पाकिस्तानने इराणमधील ७ ठिकाणांवर हवाई हल्ला केल्याचा दावा केलाय. तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एका इराणी अधिकाऱ्याची देखील हत्या केल्याची माहिती आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pakistan Airstrike on Iran
Havaman Andaj: वेस्टर्न डिस्टर्बन्सने वाढवलं शेतकऱ्यांचं टेन्शन; आज १३ राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

बलुचिस्तान प्रांतातील सुन्नी दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानने इराणला दिला होता. या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने बुधवारी रात्री इराणवर हवाई हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.

पाकिस्तानी (Pakistan) न्यूज वेबसाइट पाकिस्तान डेलीनुसार, पाकिस्तानने इराणमधील बलूच लिबरेशन आर्मी आणि बलूच लिबरेशन फ्रंटच्या तळांना लक्ष्य केले. या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाचे एक कथित फुटेजही जारी केले आहे, ज्यामध्ये तेथे एक मोठे खड्डे तयार झालेले दिसत आहेत. (Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये इराणमधील सिस्तान भागात मोठी आग लागल्याचं दिसून येत आहे. आजूबाजूला धुराटे लोटही पसरले आहे. अनेक लोक टॉर्च घेऊन घटनास्थळी उभे असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने हल्ल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे इराणकडून या हल्ल्यांना दुजोरा मिळालेला नाही.

दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सैन्याला लक्ष्य केले आहे. स्थानिक माध्यमांनुसार, दहशतवाद्यांनी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका अधिकाऱ्याची शांत परिसरात गोळी झाडून हत्या केली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Pakistan Airstrike on Iran
Firecracker Factory Blast: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com