दिल्ली, ता.|१९ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. आज पहिल्या टप्प्यातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये १०२ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
(Rahul Gandhi on Lok Sabha Election)
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. “आज मतदानाचा पहिला टप्पा आहे! लक्षात ठेवा, तुमचे प्रत्येक मत भारताच्या लोकशाहीचे आणि भावी पिढ्यांचे भवितव्य ठरवणार आहे.
त्यामुळे बाहेर पडा आणि गेल्या 10 वर्षात देशाच्या आत्म्याला दिलेल्या जखमांवर आपला 'मताचा मलम' लावून लोकशाही मजबूत करा. द्वेषाचा पराभव करा आणि प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाची द्वारे उघडा, असे राहुल गांधी म्हणालेत.
"लोकशाहीचा सर्वात मोठा सण आजपासून सुरू! लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांच्या मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे.
तसेच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान असते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.