Breaking News Former US President Donald Trump arrested for the fourth time Saam Tv
देश विदेश

Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चौथ्यांदा अटक, प्रकरण काय?

Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

Satish Daud

Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. ट्रम्प यांना या वर्षात चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे. जॉर्जियातील फुल्टन कॉटनी जेलने त्यांचा तुरुंगातील फोटो प्रसिद्ध केला आहे. त्यांच्यावर चार वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले असून वकिलांनी ४५ पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे. (Latest Marathi News)

ट्रम्प यांना अटक होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुरूंगाबाहेर मोठी गर्दी केली. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक घोटाळ्याप्रकरणी अटलांटा येथील फुल्टन काउंटी तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे.

ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र, आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांतच त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ट्रम्प यांचा ताफा अटलांटा येथील हार्ट्सफील्ड-जॅक्सन विमानतळाच्या दिशेने गेला आहे.

एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेत २०२० साली झालेल्या निवडणुकीच्या निकालात घोटाळा केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहेत. करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांची चौकशी करणाऱ्या विशेष वकिलाने ४५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

यामध्ये ट्रम्प यांच्यावर ४ आरोप करण्यात आले आहेत. युनायटेड स्टेट्सची फसवणूक करण्याचा कट, अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणण्याचे षड्यंत्र, अधिकृत कार्यवाहीमध्ये अडथळा आणणे हक्कांविरुद्ध कट रचणे, असे आरोप ट्रम्प यांच्यावर आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT