Delhi Accident News Saam TV
देश विदेश

Delhi Accident: दिल्लीत थरारक अपघात! भरधाव BMW ची चौघांना धडक; जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू

Gangappa Pujari

Delhi BMW Car Accident:

राजधानी दिल्लीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव बीएमडब्ल्यू कारने पार्किंगमधील एका कारसह चौघांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या चौघांना एम्स ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव येथे ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण दिल्लीतील (Delhi) ग्रेटर कैलास एन्क्लेव्ह-2 परिसरात काल रात्री उशिरा एका भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने पार्क केलेल्या वाहनाला मागून धडक दिली, ज्यामध्ये चार पादचारी गंभीर जखमी झाले.अपघातात जखमी झालेल्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, यशवंत नलावडे (वय, ५८) ,देवराज मधुकर (वय, ५०) मनोहर (वय, ६२) आणि नितीन अशी जखमींची नावे आहेत. हे चौघे जण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुणचे असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी हा अपघात झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, ही बीएमडब्ल्यू कार एक महिला चालवत होती. कारने सर्वात आधी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या मारुती सियाज कारला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मारुती सियाझने उलटली आणि चार जणांना त्याची धडक बसली. यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT