Jalna Lathi Charge: दूध का दूध, पाणी का पाणी झालं; अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणाचा अहवाल येताच भाजप नेत्यानं ठणकावून सांगितलं

Jalna Lathi Charge: 'दूध का दूध, पाणी का पाणी झालं,असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.
Jalna Lathi Charge
Jalna Lathi ChargeSaam tv
Published On

Pravin Darekar Latest News:

जालनाच्या अंतरावाली सराटी आंदोलनादरम्यान लाठीहल्ला प्रकरणाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणाच्या माहिती अधिकाराच्या अहवालात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा खुलासा झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहवालात निर्दोष असल्याचे समोर आल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'दूध का दूध, पाणी का पाणी झालं,असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठणकावून सांगितलं आहे. (Latest Marathi News)

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांवर भाष्य केलं. यावेळी जालना लाठीहल्ला प्रकरणावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ' दूध का दूध पाणी का पाणी झालं आहे. प्रशासन व गृहविभाग हे त्यांच्या पातळीवर निर्णय घेत असतात. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. तर अहवालात देवेंद्र फडणवीस यांचा त्या प्रकरणाशी काही संबध नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalna Lathi Charge
Jalna Lathi Charge: मोठी बातमी! अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात गृहमंत्री फडणवीस निर्दोष

संजय राऊतांच्या ट्वीटवरून विरोधकांवर टीका करताना दरेकर म्हणाले, 'संजय राऊत, नाना पटोले हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी असे करतात. चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊला कुटुंबासोबत असून हे ट्विट करणं शोभणारं नाही'.

Jalna Lathi Charge
Ajit Pawar : अजित पवारांचं भाषण सुरू असताना कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

'दुसरीकडे आपली बोटंही बरबटलेले आहेत हे लक्षात ठेवावं. आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठीच राऊत हे करतात. राजकारणाची पातळी कोण सोडतयं हे प्रथम तपासून घ्या. राजकारणाची पातळी सांभाळायची म्हणून आम्ही अनेक गोष्टी ट्विट करत नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला.

Jalna Lathi Charge
NHM Contract Employees Strike: भिवंडीत एनएचएमच्या कंत्राटी कामगारांचे थाळीनाद आंदोलन

'नाना पटोले हे धड ओबीसीच्या बाजूने नाही अन् मराठ्यांच्या बाजूने नाही... त्यांनी त्यांची भूमिका काय हे प्रथम सांगावं. दुसरीकडे विजय वड्डेटीवार एकदा सांगतात की, आम्ही छगन भुजबळांसोबत आहोत. त्यानंतर मी त्यांच्यासोबत नाही असं सांगतात, अशी टीका दरेकर यांनी काँग्रेस नेत्यांवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com