Bangladesh Violence Latest News Saam TV
देश विदेश

Bangladesh Violence : बांगलादेशात आरक्षणाविरोधातील हिंसाचारात आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू, २४५ भारतीय मायदेशी परतले

Bangladesh Violence Latest News : बांगलादेशात आरक्षणाविरोधातील हिंसाचारात आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.

Satish Daud

सरकारी नोकरीत दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या पद्धतीवरून बांग्लादेशात हिंसाचार उफाळला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच काही ठिकाणी गोळीबार देखील करण्यात आला. या हिंसाचारात आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. देशातील अशांतता रोखण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर बांग्लादेश सरकारने लष्कराला पाचारण केलं आहे.

सध्या अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारपुढे हे हिंसाचार रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. बांगलादेशातील हिंसाचाराची धग लक्षात घेता भारत सरकार देखील अलर्ट मोडवर आले आहे.

बांग्लादेशात अडकून पडलेल्या विद्यार्थी तसेच नागरिकांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत १२५ विद्यार्थ्यांसह २४५ भारतीय बांगलादेशातून मायदेशी परतले आहेत.

भारतीय उच्चायुक्तालयानेही १३ नेपाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे. भारतीय रेल्वेने शनिवारी कोलकाता-ढाका मैत्री एक्सप्रेस आणि रविवारी कोलकाता ते खुलना दरम्यानची बंधन एक्सप्रेस रद्द केली आहे. हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, बांगलादेशमध्ये ८,५०० विद्यार्थ्यांसह एकूण १५,००० भारतीय सुरक्षित आहेत. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.

बांगलादेशात हिंसाचार का उसळला?

सध्या बांगलादेशात ५६ टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षणांतर्गत राखीव आहेत. त्यापैकी ३० टक्के आरक्षण १९७१ च्या मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना देण्यात आले आहे. मागास प्रशासकीय जिल्ह्यांना १० टक्के आणि महिलांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. जातीय अल्पसंख्याक गटांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांसाठी आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना दिलेल्या आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

बांग्लादेशात आत्तापर्यंत काय-काय झाले?

  • ढाका येथे हजारो विद्यार्थ्यांची सशस्त्र पोलिस दलांशी चकमक झाली.

  • विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन करत मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.

  • पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत गोळीबार केला. यामध्ये आतापर्यंत १०५ जणांचा जीव गेला.

  • हिंसाचारात २५०० हून अधिक लोक जखमी झाले. अनेक ठिकाणी मोबाईल इंटरनेट सेवा विस्कळीत आहे.

  • ढाकामध्ये रेल्वे आणि मेट्रो रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. ३०० हून अधिक भारतीय, नेपाळी आणि भूतानी नागरिक मेघालयात पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT