Breaking : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा  Twitter/@ANI
देश विदेश

Breaking : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात हा मंत्रिमंडळ विस्तार होत असून बऱ्याच तरुणांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. 2019 मध्ये दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यापासून मोदींच्या मंत्रीमंडळातील हा पहिला सर्वात मोठा विस्तार आहे. सायंकाळी सहा वाजता हा विस्तार होईल. या पार्श्वभूमीवर आज अनेक मंत्री राजधानी दिल्लीत हजार झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात हा मंत्रिमंडळ विस्तार होत असून बऱ्याच तरुणांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही नेत्यांची सुट्टी होणार असल्याचेही दिसून येत आहे. (Breaking: Existing ministers resign before cabinet expansion)

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. तर कर्नाटकचे गव्हर्नर थावरचंद गेहलोत यांनीदेखील राज्यसभेच्या पदाचा राजीनामा राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांना सादर केला आणि सभापतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. तर, केंद्रीय रसायन व खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, आणि पश्चिम बंगालचे बाबूल सुप्रियो यांनी देखील राजीनामा दिला आहे. तसेच केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री संजय धोत्रे आणि पश्चिम बंगालच्या खासदार देबोश्री चौधरी यांच्याकडूनही राजीनामा मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या जिंकण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने ही रणनीती आखलेली दिसत आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री असून विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या 81 वर जाऊ शकते.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT