मुलीला वेश्या व्यावसायात ढकलणाऱ्या बॉयप्रेंडचा बापाकडून खून; वर्षभरानंतर उलगडा Saam TV
देश विदेश

मुलीला वेश्या व्यावसायात ढकलणाऱ्या बॉयफ्रेंडचा बापाकडून खून; वर्षभरानंतर उलगडा

सोशल मीडियावर एका वडिलांचे खूप कौतुक होत आहे. कोणी त्यांना हिरो म्हणत आहे तर कोणी त्यांना सुपरमॅन म्हणत आहे.

वृत्तसंस्था

सोशल मीडियावर एका वडिलांचे खूप कौतुक होत आहे. कोणी त्यांना हिरो म्हणत आहे तर कोणी त्यांना सुपरमॅन म्हणत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील एका वडिलांनी आपल्या मुलीला सेक्स तस्करांपासून वाचवले आणि नंतर आपल्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची हत्याही केली. सोमवारी माहिती देताना पोलिस विभागाने सांगितले की, मुलीला विकणारी व्यक्ती तिचा प्रियकर अँड्र्यू सोरेनसन आहे आणि त्याने ऑक्टोबर 2020 मध्ये मुलीला वेश्या व्यवसायात करण्यासाठी प्रवृत्त केले होते.

याचा बदला घेण्यासाठी मुलीचे वडील जॉन इसेनमन यांनी आपल्या मुलीला वेश्या व्यवसायातून बाहेर काढलेच शिवाय आरोपीला ठार मारले. एका अहवालानुसार, वडील इसेनमॅनचा कोणताही हिंसक गुन्हेगारी इतिहास नाही परंतु हत्येप्रकरणी त्याला खुनी घोषित करण्यात आले आहे, तसेच त्याला 1 दशलक्ष डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या मुलीला वेश्याव्यवसायातून मुक्त केले, त्यानंतर वडिलांनी आरोपीला पकडून त्याची हत्या केली. वडिलांनी सोरेनसनच्या डोक्यात सिंडर ब्लॉकने अनेक वार केले आणि वारंवार चाकूने वार केले, त्यानंतर तो जागीच मरण पावला. आरोपीची हत्या केल्यानंतर आपल्या मुलीचा बदला घेणाऱ्या बापाने मृतदेह दुर्गम भागात नेऊन टाकून दिला. वर्षभरानंतर आरोपीच्या मृतदेहाचे अवशेष पोलिसांना सापडले.

ही बातमी इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाली, त्यानंतर युजर्स वडिलांच्या कामाचे कौतुक करत आहेत. अनेक वापरकर्ते त्याचा गुन्हा योग्य असल्याचे मानत आहेत. एका युजरने लिहिले की, "मला आशा आहे की या माणसाला सर्वोत्तम वकील मिळेल आणि त्याला शिक्षा होणार नाही. दुसऱ्या एका व्यक्तीने असे सुचवले की, "कोणताही चांगला पिता असेच करेल." दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, "त्या वडिलांना आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या. मी त्यांच्या मुलीच्या आयुष्यभर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: तुमच्या उत्पन्नानुसार निवडा आयटीआर फॉर्म! कोणासाठी कोणता फॉर्म योग्य? वाचा सविस्तर

Ranveer Singh : 'धुरंधर'चा जबरदस्त टीझर, रणवीर सिंहसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

Ashadhi Ekadashi : नागपूरच्या वारकऱ्याला पंढरीत दर्शन रांगेत काठीने मारहाण, सुरक्षारक्षकाची मुजोरी

SCROLL FOR NEXT