कोरोनाने पतीचे निधन, एक किडनी निकामी झालेल्या महिलेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाने कुटुंब प्रमुख असणाऱ्या तरुण पतीचे निधन झाले. कुटुंबाच्या डोक्यावरील छत्र हरवले, त्यात माझी एक किडनी निकामी आहे.
कोरोनाने पतीचे निधन, एक किडनी निकामी झालेल्या महिलेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाने पतीचे निधन, एक किडनी निकामी झालेल्या महिलेचं मुख्यमंत्र्यांना पत्रSaam TV

बीड: कोरोनाने कुटुंब प्रमुख असणाऱ्या तरुण पतीचे निधन झाले. कुटुंबाच्या डोक्यावरील छत्र हरवले, त्यात माझी एक किडनी निकामी आहे. उपासमारीची वेळ आलीय, मुख्यमंत्री साहेब नोकरी द्या. अशी मागणी आर्त हाक वंदना वाघमोडे या महिलेने मुख्यमंत्र्यांना अर्ज करत केली आहे. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील अण्णा बुकाराम वाघमोडे या तरुणाचे, कोरोनाने निधन झाल्याने वाघमोडे कुटुंब उघड्यावर आले आहे. जमीन जायदाद नाही, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वाघमोडे कुटुंब उपासमारीत जगत आहे. या परिस्थीतीला कंटाळून वाघमोडे कुटुंबाने मुख्यमंत्र्याकडे नोकरी साठी विनंती अर्ज केलाय.

कोरोनाने पतीचे निधन, एक किडनी निकामी झालेल्या महिलेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2030 पर्यंत चीनच्या अण्वस्त्रांची संख्या 1000 होवू शकते: पेंटागॉन

वंदना वाघमोडे यांची एक किडनी निकामी झाली आहे. एकच किडनी असल्यामुळे वंदना यांना कोणतेही अवजड काम होत नाही. यामुळे वाघमोडे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. वंदना वाघमोडे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे, की माझ्या मुलांसह कुटुंबाच्या भविष्याचा व माझ्या शिक्षणाचा विचार करून, शासकीय नोकरी द्यावी. अशी मागणी वंदना वाघमोडे यांनी केली आहे. वाघमोडे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मागणीचा विचार करून अंगणवाडी सेविका, का होईना पण त्यांना नोकरी द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण चांदबोले यांनी केली.

कोरोना महामारीच्या संकटात अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मयत झाल्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात आहे. वंदना वाघमोडें सारख्या आर्थिक विवंचनामध्ये आणि कुटुंबाची जबाबदारी पडलेल्या कुटुंबाला, खऱ्या अर्थाने सरकारच्या वतीने मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे ठाकरे सरकार वंदनाची आर्त हाक ऐकणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com