2030 पर्यंत चीनच्या अण्वस्त्रांची संख्या 1000 होवू शकते: पेंटागॉन

चीनच्या अण्वस्त्रांची संख्या 200 पेक्षा कमी आहे आणि या दशकाच्या अखेरीस ती दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
2030 पर्यंत चीनच्या अण्वस्त्रांची संख्या 1000 होवू शकते: पेंटागॉन
2030 पर्यंत चीनच्या अण्वस्त्रांची संख्या 1000 होवू शकते: पेंटागॉनTwitter
Published On

यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की चीन आपल्या अणुऊर्जेची वाढ एका वर्षापासून वेगाने करत आहे असा अंदाज अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. या अहवालानुसार - सहा वर्षांत चीनच्या अण्वस्त्रांची संख्या 700 पर्यंत वाढू शकते आणि 2030 पर्यंत ही संख्या 1000 पेक्षा जास्त होऊ शकते. तसे, चीनकडे सध्या किती शस्त्रे आहेत हे या अहवालात सांगण्यात आलेले नाही. एक वर्षापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने सांगितले होते की चीनच्या अण्वस्त्रांची संख्या 200 पेक्षा कमी आहे आणि या दशकाच्या अखेरीस ती दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकेकडे सध्या 3,750 अण्वस्त्रे आहेत आणि ती वाढवण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. 2003 पर्यंत, यूएस अण्वस्त्रांची एकूण संख्या सुमारे 10,000 होती. बायडन प्रशासन त्याच्या आण्विक धोरणाचा व्यापक आढावा घेत आहे. विशेष म्हणजे, पेंटागॉनचा हा अहवाल डिसेंबर २०२० पर्यंत गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे. हा अहवाल जनरल मार्क मिलीच्या चिंतेवर आधारित नाही. त्याने गेल्या महिन्यात झालेल्या चीनी हायपरसोनिक शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com