Bhagwant Mann
Bhagwant Mann SAAM TV
देश विदेश

Bhagwant Mann: पंजाबचे CM भगवंत मान यांच्या घराजवळ आढळला जिवंत बॉम्ब

Nandkumar Joshi

Punjab CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच जिवंत बॉम्ब (लाइव्ह शेल) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदीगडच्या कांसलमध्ये आंब्याच्या बागेत सोमवारी हा जिवंत बॉम्ब (शेल) सापडला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.

पंजाब आणि चंदीगडच्या हद्दीत सोमवारी जिवंत बॉम्ब (शेल) आढळला. ज्या ठिकाणी हा बॉम्ब सापडला आहे, तेथून काही अंतरावरच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानही अवघ्या दोन किलोमीटरवर आहे.  (Latest Marathi News)

रिपोर्टनुसार, चंदीगड पोलीस दलाचे सिव्हिल डिफेन्स नोडल ऑफिसर कुलदीप कोहली यांनी सांगितलं की, कांसल आणि नया गावच्या टी पॉइंटच्या दरम्यान आंब्याच्या बागेत जिवंत बॉम्ब शेल आढळून आला आहे. आर्मी बॉम्ब स्क्वॉडनंही याबाबत माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी जिवंत बॉम्ब आढळून आला आहे, तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. बॉम्ब लवकरच निकामी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. (Bhagwant Mann)

या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या ठिकाणी जिवंत बॉम्ब शेल कसा आला, याचा शोध घेण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

या परिसरात पंजाब आणि हरयाणा सचिवालय अन् विधानसभाही

मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या कांसल आणि मोहालीच्या नया गावच्या सीमेजवळ हा बॉम्ब सापडला आहे. ट्युबवेल चालकानं सर्वात आधी बॉम्ब बघितला. त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ बॉम्ब स्क्वॉडला माहिती दिली. त्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, सचिवालय आणि विधानसभा परिसरही तेथून जवळच आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासाठी तयार करण्यात आलेले व्हीव्हीआयपी हेलिपॅड देखील येथून जवळ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT