पाकिस्तानात बॉंम्बस्फोट; 17 जण गंभीर जखमी, 2 जणांचा मृत्यू  Twitter/ @ANI
देश विदेश

पाकिस्तानात बॉंम्बस्फोट; 17 जण गंभीर जखमी, 2 जणांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाहोर : पाकिस्तानातील लाहोर येथील जोहर टाउनमधील रुग्णालयाजवळ मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या स्फोटात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बाबत कॅपिटल पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक माध्यमांना माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मुबंई हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईद याच्या घराजवळ हा स्फोट झाला आहे. एका साक्षीदाराने दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट इतका जोरदार होता की त्याजवळील घरे आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत आणि काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, पोलिस आणि बॉम्ब विल्हेवाट लावणारी आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहे.तर जखमींना शहरातील जिन्ना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील बर्‍याच जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींसाठी रक्तदान करण्यासाठी नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे. तसेच, चार जखमींना प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींच्या उपचारासाठी जीना हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, तर बचावकार्य वेगवान करण्याचे आदेशही स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.

त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी पोलिस महानिरीक्षकांकडून स्फोटाचा सविस्तर अहवाल मागविला आहे. तसेच. पाकव्याप्त पंजाब सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपासणीसाठी पोलिसांनी या परिसराला घेराव घातला आहे. तर रहदारी वळविण्यात आली आहे. हा स्फोट झाला त्या भागात खूप गर्दी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Anuradha Dhwade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT