पाकिस्तान दहशतवादाला पोसतंय; संयुक्त राष्ट्रात भारताचा हल्लाबोल

जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात मिशन ऑफ इंडियाचे पहिले सचिव पवन कुमार बधे यांनी ही टिका केली केली आहे.
पाकिस्तान दहशतवादाला पोसतंय; संयुक्त राष्ट्रात भारताचा हल्लाबोल
पाकिस्तान दहशतवादाला पोसतंय; संयुक्त राष्ट्रात भारताचा हल्लाबोलtwitter/ @ANI
Published On

नवी दिल्ली : दहशतवादाला मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आता पाकिस्तानला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे, अशी टिका भारताने केली आहे. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात मिशन ऑफ इंडियाचे पहिले सचिव पवन कुमार बधे यांनी ही टिका केली केली आहे. अधिवेशनात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याबद्दल आणि भारताविरूद्ध निराधार आरोप करण्याबद्दल भारताने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तान दहशतवादाला पोसतंय; संयुक्त राष्ट्रात भारताचा हल्लाबोल
औरंगाबादमध्ये पत्नी पिडिंतांची पिंपळ पौर्णिमा साजरी

दहशतवाद्यांना पाकिस्तान आसरा आणि पेन्शन

तसेच "दहशतवाद हा मानवाधिकारांचे घोर उल्लंघन आहे आणि सर्व प्रकारांवर कठोरपणे कारवाई करण्याची गरज आहे." असे मतही भारताने नोंदवले आहे. त्याचबरोबर भारतासह आसपासच्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्य़ा आपल्या हद्दीतील दहशतवाद्यांना पाकिस्तान आसरा देण्यासह पेन्शनही पुरवते. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवायांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.

जबरदस्तीने केले जाते धर्मांतरण

सचिव पवन कुमार बधे यांनी याबाबत परिषदेत भारताच्या वतीने भुमिका मांडली आहे. पाकिस्तानात, धार्मिक अल्पसंख्यांक मुली, महिलांचे जबरदस्तीने अपहरण, बलात्कार, धर्मांतरण केल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. पाकिस्तानात दरवर्षी धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या 1000 हून अधिक मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. पाकिस्तानात कठोर निंदनीय कायदे, जबरदस्ती धर्मांतरण आणि विवाह आणि अतिरिक्त न्यायालयीन हत्येद्वारे ख्रिस्ती, अहमदिया, शीख, हिंदूसह अल्पसंख्याकांचा पद्धतशीरपणे छळ करणे, अशा घटना पाकिस्तानाात सर्रासपणे घडत आहेत. पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या पवित्र आणि धार्मिक स्थळांवर हल्ले होण्याच्या आणि त्यांची तोडफोड करण्याच्या घटनाही त्या ठिकाणी सामान्य बाब झाली असल्याचे बधे यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com