Justyn Vicky Dies in Gym Video Saam TV
देश विदेश

Justyn Vicky Dies in Gym Video: 210 किलो वजनाचा बारबेल उचलताना मानेवर पडला, प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जागीच मृत्यू; व्हिडीओ आला समोर...

Fitness influencer Justyn Vicky: 210 किलो वजनाचा बारबेल उचलताना मानेवर पडला, प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जागीच मृत्यू; व्हिडीओ आला समोर...

Satish Kengar

Justyn Vicky Dies in Gym Video: अलीकडेच बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन झालं. यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध बॉडीबिल्डरच्या निधनाची दु:खद बातमी समोर येत आहे.

इंडोनेशियातील बाली येथे जिममध्ये 33 वर्षीय इंडोनेशियन फिटनेस इन्फ्लुएंसर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विकी जिममध्ये बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मान मोडली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 15 जुलै रोजी इंडोनेशियातील बाली येथील जिममध्ये व्यायाम करत असताना ही घटना घडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जस्टिन विकी पॅराडाईज बाली जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट्स करताना दिसत आहे. स्क्वॅट्स करताना त्याला सरळ उभं राहायला जमत नव्हतं. (Latest Marathi News)

यावेळी त्याने वजन उचलून उठण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो पुन्हा खाली बसला. व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, घटनेदरम्यान जस्टिन विकीचा तोल गेला आणि वजन उचलण्यात त्याची मदत करत असलेला व्यक्ती देखील बोरबेलसह मागे पडला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा जस्टिन विकी 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता.

उपचारादरम्यान झाला मृत्यू

अपघातानंतर लगेचच जस्टिन विकीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ऑपरेशननंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. जस्टिन विकीच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून सर्वजण त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT