Hatnur Dam Water: 'हतनूर धरणा'चे ४१ दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hatnur Dam News: 'हतनूर धरणा'चे ४१ दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Hatnur Dam Water
Hatnur Dam WaterSaam Tv
Published On

Hatnur Dam Water Level Today News: तापी - पूर्णा वाहणाऱ्या तापी नदी पात्रात हतनूर धरणाचे 41 दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडल्याने तापी नदीपात्रात 137093 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

हतनूर धरणाखालील जळगाव (Jalgaon) व धुळे जिल्ह्यातील तापी नदी काठावरील लोकांना संबंधित यंत्रणेकडून अति सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे. विदर्भ व जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तापी नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला असून नागरिकांनी सावधानी बाळगावी, असे आव्हान करण्यात आले आहे.

Hatnur Dam Water
Central Government Schemes: फक्त 20 रुपये खर्च करून तुम्ही मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या काय आहे 'ही' योजना...

नदीत पोहायला गेलेला युवक झाला बेपत्ता

दरम्यान, आजच जळगाव रावेर तालुक्यातील रोझोदा येथील युवक सुकी नदीवर असलेल्या गारबर्डीमध्यम प्रकल्प जवळ नदीपात्रात पोहायला गेला असता बेपत्ता झाला आहे. याबाबत तहसीलदार बी ए कापसे यांनी दिली. बेपत्ता झालेला हा युवक दुपारपर्यंत सापडला नव्हता.  (Latest Marathi News)

तालुक्यात आलेल्या एसडीआरएफच्या तुकडीने नदी पात्रात त्याचा कसून शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा युवक त्याच्या मित्रांसह सुकी नदीवरील गारबर्डी मध्यम प्रकल्पावर फिरायला गेला होता. या प्रकल्पावरच त्यांनी स्वयंपाक करून जेवण केले आणि त्यानंतर नदीपात्रात पोहायला उतरले. अन्य मित्र काठावरच आंघोळ करत असताना आपल्याला बऱ्यापैकी पोहता येते, असे म्हणत तो नदी प्रवाहात थोडा पुढे गेला आणि बेपत्ता झाला, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.

Hatnur Dam Water
Raigad Irshalgad Landslide News: इर्शाळवाडीत वाढली बघ्यांची गर्दी, मदतकार्यात अडथळा; दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद

ही घटना मित्रांनी नदीपात्रात शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलीस ठाण्यात आणि प्रशासनाकडे नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, येथील तहसीलदार बी ए कापसे, परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांनी एसडीआरएफच्या पथकासह नदीपात्रात शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com