Raigad Irshalgad Landslide News: इर्शाळवाडीत वाढली बघ्यांची गर्दी, मदतकार्यात अडथळा; दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद

Raigad Khalapur Irshalgad Landslide News and updates: इर्शाळवाडीत वाढली बघ्यांची गर्दी, मदतकार्यात अडथळा; दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद
Raigad Khalapur Irshalgad Landslide News and updates
Raigad Khalapur Irshalgad Landslide News and updatesSaam TV
Published On

Raigad Khalapur Irshalgad Landslide News and updates: इर्शाळवाडी ठाकुरवाडी दरडग्रस्त ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमत आहे. यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर इर्शाळवाडी ठाकुरवाडी दरडग्रस्त ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

इर्शाळवाडी, नंबराची वाडी, बेस कॅम्प परिसरात तसेच दुर्घटनास्थळी सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणुक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना आजपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Raigad Khalapur Irshalgad Landslide News and updates
Yavatmal Flood News: यवतमाळमध्ये महापुरात अडकले ८० जण; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू...

मिळालेल्या माहितीनुसार, फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 / 1 नुसार हा आदेश कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी जारी केला आहे. ही दरड दुर्घटना घडल्यानंतर बचाव आणि मदत पथक, शासकिय यंत्रणा यांच्या सोबत बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणत होत आहे.

यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत असून पार्किंग व्यवस्थापना, धोकादायक अरुंद आणि निसरडा रस्ता, दरड दुर्घटना स्थळी दुर्गंधीसह शासकीय यंत्रणेवर अधिकचा ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Raigad Khalapur Irshalgad Landslide News and updates
Hatnur Dam Water: 'हतनूर धरणा'चे ४१ दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; बचावकार्यासाठी व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी

खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर पोहचला आहे. बचाव पथकाकडून आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर येथे बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे २१ जवान बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी पोहचलेले आहेत. मातीच्या ढिगाऱ्या खाली सापडलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचा काम व्हाईट आर्मीचे जवान करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com