World Cup India Saam Tv (Twitter)
देश विदेश

World Cupच्या महासंग्रामानंतर राजकारणात सुरू झाला 'ब्लेम गेम' ; नेत्यांनी सांगितली पराभवाची कारणे

world cup : ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वात्तम खेळ करत भारतीय संघाला पराभूत केलं. त्यामागे काही कारणे काय होती, हे राजकीय नेत्यांनी सांगितली आहेत.

Bharat Jadhav

Team India Defeat Reason in World Cup:

आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारताचा पराभव का झाला याचे कारणे जो, नाही तो देत आहे. टीम इंडियाचा खेळ कुठे चुकला? टीम इंडिया का हारली याची कारणे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सांगितली जात आहेत. (Latest News)

वर्ल्डकप गमावल्यामुळे खेळाडू दु:खी आहेत. खेळाडूंचे भावनिक झालेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंतिम सामन्यातील पराभव किती दुखदायी आहे, हे आपल्याला त्यांचे फोटो पाहून कळतं. परंतु दु:खी झालेल्या खेळाडूंना धीर देण्याऐवजी राजकीय नेत्यांमध्ये आपला वेगळाच सामना सुरू केलाय.

क्रिकेटचे तज्ज्ञ बनून नेते आता पराभवाची कारणे सांगू लागली आहेत. राजकीय नेत्यांच्या या टीका टिप्पणींमुळे भारतीय संघाच्या पराभवाची जखम परत-परत कोरली जातेय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. वर्ल्डकपचा सामना गमावल्यानंतर सर्व खेळाडूंना रडू कोसळलं. भारतीय खेळाडूंचं दु:ख १४० कोटी जनतेनं पाहिलं. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील तेथे उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु भारतीय राजकीय नेत्यांनी या पराभवाचं राजकारण केलंय. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वात्तम खेळ करत भारतीय संघाला पराभूत केलं. त्यामागे काही कारणे काय होती याचा अभ्यास सर्व खेळाडूं आणि प्रशिक्षक, कर्णधाराला करावा लागेल. परंतु त्यांच्या आधी विरोधीपक्षाने पराभव कारण शोधलं आहे. टीम इंडियाच्या पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय.

टीम इंडियाच्या पराभवाला राजकीय रंग लागला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीम इंडियाच्या पराभवाचं वेगळंच कारण सांगितलं. "आम्ही नरेंद्र मोदी स्टेडियमवर हरलो. लोक म्हणतात जर सामना वानखेडे स्टेडियमवर (मुंबईत) झाला असता तर आम्ही जिंकलो असतो," असं राऊत म्हणाले. अशी टीका करणारे राऊत हे एकटे नाहीत.

कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर असताना भारताने मागील दोन क्रिकेट विश्वचषक जिंकले. एकदा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकलाय. तर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना भारताने २०११ चा वर्ल्ड कप आणि २००७ मध्ये टी २००७ चा वर्ल्ड कप जिंकलाय, अशी टीका काँग्रेस नेते मणीकर्म टागोर यांनीदेखील टीका केलीय.

तर उत्तर प्रदेशमधील स्थानिक नेते अजय राय म्हणाले की, त्यांच्यावर राजकीय दबाव वाढला होता. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे सामना पाहण्यासाठी तेथे उपस्थित होते. त्यामुळे खेळाडूंवर राजकीय दबाव आला त्यामुळे ते पराभूत झालेत. विरोधकांच्या टीकेला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार उत्तर दिलं गेलं आहे. भाजपच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय खेळाडूंना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा अभिमान आहे.

या प्रवक्त्यानं आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिकमधील देशाच्या कामगिरीची उदाहरणे दिली. खेळ हा खेळ आहे आणि विजय-पराजय हा खेळाचा भाग आहे, असंही भाजप प्रवक्त्याने सांगितले. वर्ल्डकपचा सामना झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्स (आधीच्या ट्विटरवर) दोन पोस्ट केल्या. एकामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचं अभिनंदन केलं. तर दुसऱ्या पोस्टमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांना सात्वंन केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

SCROLL FOR NEXT