
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सात गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात झालेल्या या पराभवाने करोडो भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले. या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू खूपच भावूक झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली.
टीम इंडियाच्या (Team India) विश्वचषकातील पराभवाने देशभरातील क्रिकेट प्रेमी निराश झाले आहेत.स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहाव लागल्याने 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. या पराभवामुळे भारतीय खेळाडू खूपच निराश झालेत.
त्यांना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमला भेट दिली. टीम इंडियाच्या पराभवानंतर पंतप्रधानांनी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. मोहम्मद शमीने एक फोटो ट्विट केला आहे. या पोस्टमध्ये भावूक झालेल्या शमीला पंतप्रधान मोदी धीर देत असल्याचे दिसत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय म्हणाला शमी?
"मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो. जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु" असा विश्वास मोहम्मद शमीने व्यक्त केला आहे. तसेच रविंद्र जडेजानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने या पराभवाने निराशा झाली असली तरी पुन्हा पुनरागमन करु.. असे त्याने म्हणले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.