ग्लेन मॅक्सवेलचा तो विनिंग शॉट अन् १.३० लाख लोकं शांत झाली. ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू मैदानाच्या दिशेने धाव घेत होते. मैदानावर आतिषबाजी सुरू होती. तर दुसरीकडे पराभवामुळे निराश झालेले भारतीय खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसून येत होते.
हे चित्र भारतीय क्रिकेट फॅन्स कधीच विसरू शकणार नाही. काही खेळाडू मैदानावरच बसले, काही कॅपच्या साहाय्याने आपलं तोंड लपवत होते. यादरम्यान लक्ष वेधलं ते रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजने.
ग्लेन मॅक्सवेलने धाव पूर्ण करताच रोहितने पॅव्हेलियनची वाट धरली होती. सुरुवातीला तो हळू हळू चालत होता. त्यानंतर त्याचे पाय वेगाने चालू लागला. चेहऱ्यावर नैराश्य आणि अश्रू लपवत तो पुढे जात होता. दरम्यान मैदानाच्या बाहेर जात असताना त्याला अश्रू अनावर झाले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागले आहेत.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तर मैदानावरच रडू लागला. त्याला अश्रू अनावर झाले होते. तो रडत असताना संघातील इतर खेळाडू त्याला सांत्वन करताना दिसून आले. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याला मीठी मारताना दिसून आला.
भारताचा संघ गेल्या १० सामन्यांमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यातही भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. (Latest sports updates)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेडने १३७ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.