Ind vs Aus, World Cup Final: बुमराहच्या गोलंदाजीवर मिळालं जीवदान !शमीने वचपा काढत मिळवली वॉर्नरची विकेट;पाहा Video

Mohammed Shami Took David Warner Wicket: या सामन्यातील शमीने दुसऱ्याच षटकात वॉर्नरला बाद करत माघारी धाडलं आहे.
mohammed shami
mohammed shamitwitter
Published On

India vs Australia, World Cup Final 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या आहेत.

तर ऑस्ट्रेलियाला हा सामना करण्यासाठी २४१ धावांची गरज आहे. दरम्यान दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. डेव्हिड वॉर्नर अवघ्या ७ धावांवर माघारी परतला आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाने २४१ धावांचं आव्हान दिल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेडची जोडी मैदानावर आली होती. भारतीय संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता.

जसप्रीत बुमराहने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. हा चेंडू बॅटची कडा घेत पहिल्या स्लिपच्या दिशेने गेला होता. मात्र स्लिपला असलेल्या विराट कोहली आणि शुभमन गिलच्या मधून हा चेंडू निघाला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर त्याला जीवदान मिळालं.

डेव्हिड वॉर्नरला जीवदान मिळल्यानंतर असं वाटलं होतं की, तो संधीचा फायदा घेत मोठी खेळी करेल. मात्र असं काहीच झालं नाही. दुसऱ्या षटकात रोहितने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत, दुसऱ्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद करत माघारी धाडलं.

यावेळीही शमीने चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत स्लिपमध्ये असलेल्या विराट कोहलीच्या हाती गेला. यावेळी विराट कोहलीने कुठलीही चूक केली नाही. डेव्हिड वॉर्नर स्वरुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला.

mohammed shami
IND vs AUS, World Cup Final: ना धोनी,ना विराट..जे कोणालाच नाही जमलं ते हिटमॅन करुन दाखवणार! WC फायनलमध्ये रचणार इतिहास

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान..

ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या आहेत. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने ४७ धावा करत दमदार करुन दिली. या डावात केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने केवळ १ चौकार मारला. तर विराट कोहलीने ६३ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

mohammed shami
World Cup Final 2023 In Bollywood Celebs: नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी; आशा भोसले, किंग खान, दीपिका पदुकोणसह दिग्गजांनी लावली हजेरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com